Advertisement

शिवसेनेच्या आ. नीलम गोऱ्हे बनल्या विधान परिषदेतील पहिल्या महिला उपसभापती

शिवसेनेच्या आमदार डाॅ. नीलम गोऱ्हे यांची सोमवारी विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर डॉ. गोऱ्हे विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती बनल्या आहेत.

शिवसेनेच्या आ. नीलम गोऱ्हे बनल्या विधान परिषदेतील पहिल्या महिला उपसभापती
SHARES

शिवसेनेच्या आमदार डाॅ. नीलम गोऱ्हे यांची सोमवारी विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर डॉ. गोऱ्हे विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती बनल्या आहेत. काँग्रेसने उपसभापतीपदावरील दावा सोडल्याने गोऱ्हे यांची निवड निश्चित मानली जात होती.

काँग्रेसचा दावा

या आधी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचा कार्यकाळ १७ जुलै २०१८ रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होतं. विधान परिषदेतील संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसनं या पदावर दावा केला होता. परंतु उपसभापती पदावर दावा करणार असाल, तर विधानसभेतील विरोधीपक्ष नेतेपद देणार नाही, असा इशारा युतीने काँग्रेसला दिला होता.

त्यामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसने अखेर उपसभापती पदावरील आपला दावा सोडल्याने गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसकडून उपसभापती पदासाठी जोगेंद्र कवाडे यांनी अर्ज केला होता. तो मागे घेण्यात आला. 

नावांची घोषणा

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांचं नावं विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी ठरवलं होतं. तसं पत्रंही काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहिलं होतं. त्यानुसार विरोधी पक्ष नेते आणि उपसभापतींच्या नावांची एकाच दिवशी घोषणा करण्यात आली.  

विधान परिषदेतील संख्याबळ

सध्या विधान परिषदेत राष्ट्रवादीचे १७, काँग्रेसचे १६, भाजपाचे २३ , शिवसेनेचे १२, लोकभारती ,शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षचा प्रत्येकी १ आमदार आहे, तर, ६ अपक्ष आमदार आहेत.

कोण आहेत गोऱ्हे?

नीलम गोऱ्हे शिवसेनेकडून पुण्याहून विधानपरिषदेवर आमदार आहेत. आतापर्यंत ३ वेळा त्या विधानपरिषदेवर निवडून गेल्या आहेत. शिवसेनेची पुणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडं आहे. एक अभ्यासू महिला आमदार म्हणून गोऱ्हे यांनी राज्यातील महिलांच्या असंख्य प्रश्नांवर काम केलं आहे. राज्य सरकारच्या विशेष हक्क समितीचे अध्यक्षपदही गोऱ्हे यांनी भूषवलं आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीमध्ये संघटनात्मक बदल गोऱ्हे यांनी घडवून आणले आहेत.  



हेही वाचा-

मंत्रीपद धोक्यात? विखे-पाटील, क्षीरसागर, महातेकरांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

वैद्यकीय प्रवेश: सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा