Advertisement

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाने दिली परवानगी

आरोपीनी ती चिठ्ठी पायलच्या खोलीत कुठे ही आढळून न आल्याने आरोपींनी ती चिठ्ठी नष्ठ केल्याचा संशय होता. या चिठ्ठीचा फोटो पायलने तिच्या मोबाइलमध्ये काढला होता.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाने दिली परवानगी
SHARES

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाने गुन्हे शाखेला परवानगी दिली आहे. सोमवार ते शुक्रवार गुन्हे शाखेचे पोलिस तीन ही महिला डॉक्टरांकडे भायखळा तुरूंगात जाऊन चौकशी करणार आहेत. या गुन्ह्यात  तीन महिला डॉक्टरांवर पोलिसांनी पुरावे नष्ट केल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकिस आले आहे.  


पुरावे नष्ठ केल्याचा आरोप

डॉ. पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रमुख आरोपाप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर यांना अटक करण्यात आली आहे. या तिघींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल केला होता. माञ आठवड्याभरानंतर हा गुन्हा गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग केला. तो पर्यंत तिन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपूष्ठात आली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने न्यायालयात धाव घेत आरोपींकडे चौकशी करण्यास मिळावी अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने गुन्हे शाखेला आटवड्या भराच्या चौकशीसाठी परवानगी दिली होती.

दुसऱ्यांदा चौकशीसाठी परवानगी

तडवीच्या आत्महत्येनंतर तिने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना दोषी ठरवत चिठ्ठी लिहिली होती असे पुढे आले होते. माञ आरोपीनी ती चिठ्ठी पायलच्या खोलीत कुठे ही आढळून न आल्याने आरोपींनी ती चिठ्ठी नष्ठ केल्याचा संशय होता. या चिठ्ठीचा फोटो पायलने तिच्या मोबाइलमध्ये काढला होता.  पायलच्या आत्महत्येनंतर प्रकरण चिघळल्यानंतर न्यायवैद्यकिय अहवालात ती चिठ्ठी पोलिसांना तिच्या मोबाइलमध्ये आढळून आली. त्यामुळे या प्रकरणात अजून ही तपास करणे गरजेचा असल्याचे सांगत गुन्हे शाखेने दुसऱ्यांदा न्यायालयाकडे आरोपींची चौकशी करण्यास मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने शनिवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांना दुसऱ्यांदा आरोपींच्या चौकशीसाठी परवानगी दिली आहे.


हेही वाचा

पेट्रोल, डिझेल अडीच रुपयांनी महागले
 

संबंधित विषय
Advertisement