Advertisement

पेट्रोल, डिझेल अडीच रुपयांनी महागले

अर्थमंत्री न‍िर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर १ रुपये अतिरिक्त कस्टम ड्यूटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस आकारण्याची घोषणा केली.

पेट्रोल, डिझेल अडीच रुपयांनी महागले
SHARES

शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या  केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरील करात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. मुंबईत पेट्रोल  प्रती लिटरला 2.40 रुपयांनी  तर डिझेल  2.50 रुपयांनी महागलं आहे. पेट्रोल, डिझेल महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढतील. 

मुंबईत पेट्रोलचा भाव आता  प्रती लिटरला 78.57 रुपये तर डिझेलचा दर 69.90 रुपये झाला आहे. अर्थमंत्री न‍िर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर १ रुपये अतिरिक्त कस्टम ड्यूटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस आकारण्याची घोषणा केली. सेस वाढवल्याने सरकारी तिजोरीवर 28 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. आगामी काळातही  पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. 




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा