बनावट दागिने गहाण ठेवून बँकांची फसवणूक, ६ जणांना अटक

तक्रारदारांचे सिद्धनाथ ज्वेलर्स हे दुकान असून असून त्यांनी मार्च २०१९ मध्ये कोटक महिंद्रा बँकेत लिलावात काढलेले १ लाख ६४ हजार रुपयांचे दागिने विकत घेतले. मात्र, तपासणीत बँकेने बनावट दागिने दिल्याचे त्यांनी बँकेच्या लक्षात आणून दिले.

बनावट दागिने गहाण ठेवून बँकांची फसवणूक, ६ जणांना अटक
SHARES

 बनावट दागिने गहाण ठेवून बँकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी मुंबईच्या मालमत्ता विभागाने सहा जणांना अटक केली आहे.  रमेश सोनी, दिनेश सोनी, बिमल सोनी, अनिलकुमार स्वामी, प्रशांत नारायण आणि नितू विलयील अशी या आरोपींची नावे आहेत.


लिलावातील दागिने घेतले

तक्रारदारांचे सिद्धनाथ ज्वेलर्स हे दुकान असून असून त्यांनी मार्च २०१९ मध्ये कोटक महिंद्रा बँकेत लिलावात काढलेले १ लाख ६४ हजार रुपयांचे दागिने विकत घेतले. मात्र, तपासणीत बँकेने बनावट दागिने दिल्याचे त्यांनी बँकेच्या लक्षात आणून दिले. यातील काही सोने विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांनीही ते दागिने बनावट असल्याची तक्रार बँकेकडे केली. त्यानंतर बँकेने सोने तारण ठेवणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला. तपासात या सहा जणांच्या टोळीचा सहभाग उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांनी अटक केली.


पोलिस कोठडी

चौकशीत त्यांनी तांब्याच्या पत्र्याचे तुकडे, खोटे माणिक याद्वारे सोन्याचे दागिने बनवून त्याला वरून सोन्याचे पाणी लावण्यात आले असल्याची कबुली दिली.  बघताच क्षणी ते दागिने सोन्याचे असल्याचे वाटायचे. अशा प्रकारे या सहा जणांनी आतापर्यंत मुंबईतील २० नामांकित बँकांना गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. न्यायालयाने या आरोपींना १ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.हेही वाचा -

ओशिवरा येथे गोळ्या झाडून एकाची हत्या

दादरमधील हत्येप्रकरणी आरोपीला सोलापूरमधून अटक
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा