ओशिवरा येथे गोळ्या झाडून एकाची हत्या

इमारतीत फारशी वर्दळ आणि विकी यांच्या घरी कुणी नसल्याचा अंदाज घेऊन अचानक त्याने त्याच्याजवळील पिस्तुलीतून विकीवर दोन गोळ्या झाडल्या आणि पळ काढला. या दोन्ही गोळ्या विकी यांच्या छातीत घुसल्या आणि ते रक्ताच्या थारोळ्यात जमिनवर पडले.

ओशिवरा येथे गोळ्या झाडून एकाची हत्या
SHARESअंधेरीतील ओशिवरा परिसरात एका 33 वर्षीय तरुणाची त्याच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकिस आली. या हल्यात विकी श्रीनिवास गंजी याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हे शाखाचे पोलिस अधिक तपास करत आहेत

गोळ्या झाडून हत्या


ओशिवरा येथील हिरा पन्ना माँलजवळील नर्मदा इमारतीत विकी हा फ्लँट नं 311 मध्ये राहतो. सोमवारी सायंकाळी विकी यांना भेटण्यासाठी साडे नऊच्या सुमारास  एक अनोळखि व्यक्ती  घरी आला होता. इमारतीत फारशी वर्दळ आणि विकी यांच्या घरी कुणी नसल्याचा अंदाज घेऊन अचानक त्याने त्याच्याजवळील पिस्तुलीतून विकीवर दोन गोळ्या झाडल्या आणि पळ काढला. या दोन्ही गोळ्या विकी यांच्या छातीत घुसल्या आणि ते रक्ताच्या थारोळ्यात जमिनवर पडले. 

पूर्ववैमन्यसातून हत्या केल्याचा संशय


फायरिंगच्या आवाजानो विकी यांचे शेजारी घराबाहेर आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विकीच्या दिशेने त्यांनी धाव घेतली. माञ तो पर्यंत आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिस नियंञण कक्षाला देत, विकील् उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेले. माञ विकीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्ञाव झाल्यामुळे उपचारा दरम्यानच विकीचा मृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी घोषीत केले. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अनोळखि व्यक्ती विरोधात 302 भा.द.वि कलमांतर्गत  हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपींची ओखळ पटवण्यासाठी परिसरातील सीसीटिव्हींची चाचपणी सुरू केली. त्यावेळी एक अनोळखि व्यक्ती तोंड लपवून विकीच्या इमारतीतून बाहेर पडताना दिसत असल्याचे सीसीटिव्हीत आले आहे. पूर्ववैमन्यसातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा