रिक्षातून करायचे सोनसाखळी चोरी, ओशिवरा पोलिसांनी केली तिघांना अटक

ऐरवी दुचाकीहून चोरी करणाऱ्या चोरांनी या गुन्ह्यात चक्क रिक्षाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे या चोरीत एका महिलेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

रिक्षातून करायचे सोनसाखळी चोरी, ओशिवरा पोलिसांनी केली तिघांना अटक
SHARES

दुचाकीहून सोनसाखळी चोरणारे चोरटे सीसीटिव्हींच्या मदतीनं अलगद पोलिसांच्या हाती लागू लागल्यामुळं, चोरांनी आता रिक्षांचा आधार घेतला आहे. नुकतंच ओशिवरामध्ये तीन चोरानी रिक्षातून रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेचे दागिने हिसकावले. तिनं दिलेल्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा माग काढत त्यांच्या मुस्क्या आवळल्या, या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

हेही वाचाः- भयंकर! महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली, १५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईत लाॅकडाऊनमुळे पावला पावलावर पोलिस तैनात होते. मात्र लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मुंबईत आता पून्हा सोनसाखळी चोरांनी डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. असाच एक प्रकार अंधेरीतील ओशिवरा परिसरात उघडकीस आला आहे. मात्र यंदा सोनसाखळी चोरांनी चोरी करताना त्यांचा पॅटर्न बदलल्याचे पहायला मिळाले. ऐरवी दुचाकीहून चोरी करणाऱ्या चोरांनी या गुन्ह्यात चक्क रिक्षाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे या चोरीत एका महिलेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. ओशिवरा परिसरात एक महिला रस्त्यावरून जात असताना लक्ष्मण माणिकप्पा पुजारी, राजू राघुनंद दास, लता काळे या तिघांनी मिळून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेची सोनसाखळी खेचून पळ काढला. या प्रकरणी महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. मागील अनेक दिवसांपासून हे प्रकार सुरू झाल्याने ओशिवरा पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पवार, पोलिस उपनिरीक्षक तुषार सावंत आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्याचे शिवाजी शिंदे यांनी मोठ्या शिताफीने सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपींच्या रिक्षाचा नंबर मिळवला. या रिक्षाचा माग काढत पोलिस अखेर आरोपींपर्यंत पोहचले. पोलिसांनी लक्ष्मण माणिकप्पा पुजारी, राजू राघुनंद दास, लता काळे या तिघांवर कलम ३९२,३४ भा.द.वी गुन्ह्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.

हेही वाचाः- महाराष्ट्रात ई-पासबाबतचे नियम कायम, गृहमंत्र्यांनी केला खुलासा

पोलिसांनी या आरोपींकडून चोरीची चैन आणि गुन्ह्यात वापरलेली आँटोरिक्षा जप्त केली आहे.  तपासात दुचाकीहून चोरी करतान चोरांचा बॅलन्स जायचा. तसंच, सीसीटिव्हीतही त्यांची छबी स्पष्ट दिसायची. त्यामुळं आरोपीचा माग काढणं पोलिसांना सोपं जात होतं. मात्र, आरोपींनी आता स्वतःची ओळख लपवण्यासाठी चोरी करण्यासाठी कधी कधी चोरीच्या रिक्षांचा आधार घेत असल्याचे अनेक गुन्ह्यातून पुढे येत आहे. या प्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा