सोनसाखळी चोरांनी चोरीचा पॅटन बदलला, दुचाकीची जागा घेतली रिक्षाने

दुचाकीहून चोरी करतान चोरांचा बॅलन्स जायचा. तसंच, सीसीटिव्हीतही त्यांची छबी स्पष्ट दिसायची. त्यामुळं आरोपीचा माग काढणं पोलिसांना सोपं जात होतं. मात्र, आरोपींनी आता स्वतःची ओळख लपवण्यासाठी चोरी करण्यासाठी चोरीच्या रिक्षांचा आधार घेतला आहे.

सोनसाखळी चोरांनी चोरीचा पॅटन बदलला, दुचाकीची जागा घेतली रिक्षाने
SHARES

दुचाकीहून सोनसाखळी चोरणारे चोरटे सीसीटिव्हींच्या मदतीनं अलगद पोलिसांच्या हाती लागू लागल्यामुळं, चोरांनी आता रिक्षांचा आधार घेतला आहे. नुकतंच चेंबूरमध्ये एका चोरानं रिक्षातून रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेचे दागिने हिसकावले. तिनं दिलेल्या तक्रारीनंतर चोरटे आता रिक्षाचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. 


१० ग्रॅमचं मंगळसूत्र

चेंबूरमधील आर. सी. मार्गावर जैन मंदिराजवळ राहणाऱ्या नेहा शहा (४९) या ३१ मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणं माॅर्निंग वॉकला घराबाहेर पडल्या होत्या. त्या ७:३५ वाजताच्या सुमारास  डी. के. सांडू पुतळ्याजवळ ओमकार बिल्डिंग येथे वॉकिंग करीत असताना समोरून आलेल्या रिक्षा चालकानं नेहा यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र खेचलं. नेहा यांना काही कळायच्या आतच रिक्षाचालक सांडू गार्डनच्या दिशेनं पळून गेला.


रिक्षा चोरीला

या प्रकरणी नेहा यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्हीच्याआधारे चोरट्यांनी वापरलेली रिक्षा ( MH-04, JH-0309) शोधून काढली. ही रिक्षा ठाण्याच्या घोडबंदर परिसरातील साईनाथ सेवा नगर येेथे राहणाऱ्या सचिन नरसिंग माने यांची असल्याचं तपासात पुढे आलं. चौकशीत माने यांनी रिक्षा त्यांचीच असून, ती काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्याचं सांगितलं. या प्रकरणी कशिमिरा पोलीस ठाणे येथे त्यांनी रितसर तक्रारही नोंदवल्याचं पोलिसांना सांगितलं.


चोरीच्या रिक्षाचा आधार

दुचाकीहून चोरी करतान चोरांचा बॅलन्स जायचा. तसंच, सीसीटिव्हीतही त्यांची छबी स्पष्ट दिसायची. त्यामुळं आरोपीचा माग काढणं पोलिसांना सोपं जात होतं. मात्र, आरोपींनी आता स्वतःची ओळख लपवण्यासाठी चोरी करण्यासाठी चोरीच्या रिक्षांचा आधार घेतला आहे. नेहा यांच्यासारख्यांसह अन्य महिलांनाही आरोपींनी अशा प्रकारे लक्ष केलं आहे. या प्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १० टक्केच पाणीसाठी

'विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप पक्षांची युती राहणार कायम' - चंद्रकांत पाटीलसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा