मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १० टक्केच पाणीसाठा

राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळं लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा झपाट्यानं खालावत चालला आहे. या तलावांमधील पाण्याची पातळी खाली गेल्यानं तलावांमध्ये फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

SHARE

राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळं लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा झपाट्यानं खालावत चालला आहे. या तलावांमधील पाण्याची पातळी खाली गेल्यानं तलावांमध्ये फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जून अखेरपर्यंतच पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं पालिकेनं पाणीपुरवठा व्यवस्थित होण्याकरीता नियोजन सुरू केलं आहे. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील पालिकेनं केलं आहे.


३८०० दशलक्ष लिटर

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा ७ धरणांमधून पाणीपुरवठा होतो. या धरणांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. १० टक्के पाणीकपातीमुळं दैनंदिन पुरवठा ३५०० दशलक्ष लिटरपर्यंत आला आहे. सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी असणं आवश्यक असतं. परंतु, मागील वर्षीच्या अपुऱ्या पावसामुळं यावर्षी तब्बल २ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी आहे.


राखीव साठा

७ तलावांमध्ये मिळून १ जून रोजी १ लाख ४३ हजार ८५९ दशलक्ष लिटर तर, भातसा व वैतरणा धरणात १ लाख ७० हजार दशलक्ष लिटर राखीव साठा आहे. दोन्ही मिळून ३ लाख १३ हजार ८५९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे.  त्यामुळं मुंबईत आणखी पाणीकपात करणार नाही, असं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.हेही वाचा -

'विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप पक्षांची युती राहणार कायम' - चंद्रकांत पाटील

लोकलमध्ये आढळलं ७ दिवसांचे अर्भक, वेळीच फोन आल्यानं वाचले बाळाचे प्राणसंबंधित विषय
ताज्या बातम्या