Advertisement

विधानसभा निवडणुकीसाठी युती कायम राहणार - चंद्रकांत पाटील

लोकसभा निवडणुकीत मुंबईसह देशभरात शिवसेना-भाजप मिळालेल्या दणदणीत विजयानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप पक्षांची युती कायम राहणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी युती कायम राहणार - चंद्रकांत पाटील
SHARES

लोकसभा निवडणुकीत मुंबईसह देशभरात शिवसेना-भाजप मिळालेल्या दणदणीत विजयानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप पक्षांची युती कायम राहणार आहे. यंदा विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप समान जागांवर लढणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. शिवसेना आणि भाजप १३५-१३५ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. 


जनतेची पसंती

राज्यात यंदा सप्टेंबर अथवा ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदासाठी भाजप, शिवसेना आणि जनतेची पसंती असल्याचं देखील महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.  


इतर पक्षांना१८ जागा

दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत १३५-१३५ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तसंच, इतर पक्षांसाठी १८ जागा सोडणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या आहेत.हेही वाचा -

जेटच्या २ हजार कर्मचाऱ्यांसाठी स्पाईस जेट रोजगार उपलब्ध करणार

रेल्वेप्रमाणं आता एसटीचा प्रवास होणार कॅशलेशRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा