Advertisement

महाराष्ट्रात ई-पासबाबतचे नियम कायम, गृहमंत्र्यांनी केला खुलासा

केंद्र सरकारने राज्यांतर्गंत प्रवासासाठी आवश्यक ई-पासबाबतचे निर्बंध हटवले असले, तरी महाराष्ट्रातील जिल्हांतर्गत प्रवासावरील ई-पासची अट कायम आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रात ई-पासबाबतचे नियम कायम, गृहमंत्र्यांनी केला खुलासा
SHARES

केंद्र सरकारने राज्यांतर्गंत प्रवासासाठी आवश्यक ई-पासबाबतचे निर्बंध हटवले असले, तरी महाराष्ट्रातील जिल्हांतर्गत प्रवासावरील ई-पासची अट कायम आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. (rules for e pass continues in maharashtra for inter district travelling says home minister anil deshmukh)

अनलाॅकच्या प्रक्रियेनुसार आता 'केंद्र सरकारने वाहतुकीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध उठवले आहेत. खासगी वाहनं आणि मालवाहतुकीवरील निर्बंध हटवल्याचं देखील केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात देखील केंद्र सरकारची अधिसूचना लागू करायची की नाही बाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात येईल हे अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. त्यानुसार चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रातील खासगी वाहतुकीवरील अटी कायम ठेवण्यात येणार असल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - गुड न्यूज ! राज्यात आता वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही

याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत लाॅकडाऊन शिथिल केलं. परंतु लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करताच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार झाला. सुरूवातीच्या ३ महिन्यांमध्ये ग्रामीण भागात कोरोना पसरलेला नव्हता. त्यामुळे दक्षता म्हणून महाराष्ट्रात ई-पासबाबत नियम कायम ठेवण्यात आलेले आहेत. पुढील काही दिवसांनी याबाबत पुनर्विचार केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारने राज्यभर एसटी सेवा सुरू करताना, एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पासची अट काढून टाकली होती. मात्र खासगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना ई-पास बंधनकारक असल्याचंही स्पष्ट केलं होतं. त्यानंतर खासगी वाहनांसाठी ई-पासची अट रद्द करण्याची मागी होऊ लागली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा