उपनगरात सोनसाखळी चोरांचा उच्छाद, अर्ध्या तासात ६ गुन्हे

चोरांना उपनगरातील रस्ते शहरातील रस्त्यांपेक्षा पळण्यासाठी थोडे मोकळे मिळतात. त्यामुळं बॅगा हिसकावणारे अशाच जागा निवडतात. रविवारी या चोरट्यांनी ६ ठिकाणी बेसावध महिलांना अवघ्या १० मिनिटाच्या फरकानं लक्ष केलं.

उपनगरात सोनसाखळी चोरांचा उच्छाद, अर्ध्या तासात ६ गुन्हे
SHARES

चालताना किंवा प्रवासादरम्यान कधी तुमच्या हातातील बॅग हिसकावली जाईल याचा काही नेम नसतो. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सोनसाखळी चोरांचा उच्छाद वाढला आहे. रविवारी या चोरट्यांनी अवघ्या अर्धातासात ६ चोऱ्या केल्याचं समोर आलं आहे. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असून, पोलिस या चोरांचा माग काढत आहेत.


पर्स, मोबाइल चोरी

काही दिवसांपूर्वी सोनसाखळी चोरांनी मुंबई पोलिसांच्या नाकात दम आणला होता. सोनसाखळी चोरांची जागा आता बॅग, पर्स आणि मोबाइल चोरांनी घेतली आहे. रस्त्यातून चालताना, टॅक्सी- रिक्षामध्ये प्रवास करताना चोरटे मोटारसायकवरून सुसाट वेगानं येतात आणि बेसावध असलेल्या रहिवाशांच्या हातातून क्षणात बॅग हिसकावतात. भर रस्त्यात मौल्यवान वस्तू लुटण्याच्या घटना मुंबईत वाढत आहेत. 


४ गुन्ह्यांची नोंद

चोरांना उपनगरातील रस्ते शहरातील रस्त्यांपेक्षा पळण्यासाठी थोडे मोकळे मिळतात. त्यामुळं बॅगा हिसकावणारे अशाच जागा निवडतात. रविवारी या चोरट्यांनी ६ ठिकाणी बेसावध महिलांना अवघ्या १० मिनिटाच्या फरकानं लक्ष केलं. मात्र, गुन्हा फक्त ४ ठिकाणी नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


चोरीचा क्रम

१. रात्री ९.१५ वाजता  मालाड धानजीवाडी

२. रात्री ९.२५ वाजता मालाड गोविंदनगर

३. रात्री ९.३५ वाजता मालाड अपर गोविंदनगर

४. राञी ९.४५ वाजता ओबेरॉय माल, मालाड 

५. साकीनाका 

६. कुरार


११२ घटना

सन २०१६ मध्ये मुंबईमध्ये सोनसाखळी चोरीचे ४४५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी २४५ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. तसंच, २०१७ मध्ये हा आकडा १६९ वर आला तर ११३ गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी पकडले. चालू वर्षांमध्ये सोनसाखळी चोरीच्या ११२ घटना घडल्या असून, त्यापैकी ६२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. 



हेही वाचा -

शालिमार एक्सप्रेसमध्ये आढळल्या जिलेटीनच्या ५ कांड्या

ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा