Advertisement

ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते पद्मश्री दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं बुधवारी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. दिनयार मागील बऱ्याच काळापासून आजारी होते

ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन
SHARES

ज्येष्ठ विनोदी अभिनेते पद्मश्री दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं बुधवारी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. दिनयार मागील बऱ्याच काळापासून आजारी होते. दिनयार यांच्यावर मुंबईतील वरळीतील  प्रेयर हॉल इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दिनयार यांनी १९६६ साली नाटकातून अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती.  त्यांनी वठवलेल्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. त्यांनी ‘बाजीगर’, ‘३६ चायना डाऊन’, ‘खिलाडी’, ‘बादशाह’ अशा सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.

तसंच ‘खिचडी’, ‘कभी इधर कभी उधर’, श्रीमान श्रीमती आणि ‘हम सब एक है’ सारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. हिंदीसोबत दिनयार यांनी गुजराती नाटकांमध्येही काम केलं. 

सिने क्षेत्रातील योगदानामुळे २०१९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.  


हेही वाचा-

‘बिग बॉस’मध्ये भरणार चोर बाजार!


 

संबंधित विषय
Advertisement