‘बिग बॉस’चं खऱ्या अर्थानं युनिक आहे. इथं कधी काय घडेल याचा नेम नाही. कधी, कुणाचा, कुणाशी वाद होईल आणि ‘बिग बॉस’ कधी, कोणता टास्क देतील याचाही अंदाज बांधता येत नाही. आता ‘बिग बॉस’ मराठीमध्ये चोर बाजार भरणार आहे.
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातील सदस्यांना नवनवीन टास्क दिले जातात. जे कधी मजेदार, तर कधी आव्हानात्मक असतात. आज घरामध्ये चोर बाजार हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन दिवस असून या कार्यात दोन्ही टीम एकमेकांच्या विरुध्द खेळणार आहेत म्हणजेच - टीम ए आणि टीम बी. टीम ए चे सदस्य आज चोर असणार आहेत, तर टीम बी चे पोलीस आणि दुकानदार. चोरांनी दुकानदार आणि पोलिसांच्या गोष्टी चोरायच्या आहेत आणि त्या दुकानदारांना विकायच्या आहेत.
हेही वाचा-
EXCLUSIVE : शनाया बनली स्कूबा डायव्हर
... तर 'बिग बॉस'च सर्वांना करतील नॉमिनेट?