... तर 'बिग बॉस'च सर्वांना करतील नॉमिनेट?

'बिग बॉस' मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा खेळ पहिल्या दिवसापासून चांगलाच रंगू लागला आहे. नवनवीन टास्क आणि वादविवाद यांच्यामुळे ही रंगत आणखीनच वाढत आहे.

  • ... तर 'बिग बॉस'च सर्वांना करतील नॉमिनेट?
SHARE

'बिग बॉस' मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा खेळ पहिल्या दिवसापासून चांगलाच रंगू लागला आहे. नवनवीन टास्क आणि वादविवाद यांच्यामुळे ही रंगत आणखीनच वाढत आहे.


पोपटाचा पिंजरा

'बिग बॉस' मराठीच्या घरात सध्या पोपटाचा पिंजरा हा टास्क सुरू आहे. ज्यावरून घरामध्ये काल बरेच वाद देखील झाले. नेहानं दिलेलं कारण मैथिलीला अजिबात न पटल्यानं सोमवारी मैथिली नेहावर खूप चिडली. मैथिलीनं नेहाला कॅप्टनसी मिळावी म्हणून वोट दिलं होतं. जेव्हा हे मैथिलीनं नेहाला सांगितलं, तेव्हा नेहा म्हणाली की, मला कुणावरही विश्वास नाही. नेहाच्या या वक्तव्यावर मैथिलीनं नाराजी व्यक्त केली. सोमवारी या टास्कमध्ये पराग, वीणा, माधव हे नॉमिनेट झाले. 


 बिचुकले वैतागले

आज पोपटाचा पिंजरा या टास्कवरूनच 'बिग बॉस'नं हे जाहीर केलं कि, जर सदस्यांनी कुणाला नॉमिनेट केलं नाही, तर बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करतील. आता काय पुढे काय होईल? याची उत्सुकता वाढली आहे. 'बिग बॉस'च्या घरातील सर्वच सदस्य नॉमिनेट होतील का? हे पहायचं आहे. आज केवळ इतकंच पहायला मिळणार नसून, शिवानी, शिव आणि दिगंबर यांनी मिळून अभिजीत बिचुकले यांची कशी गंमत केली तेदेखील आज पहायला मिळेल. बिचुकले बाथरूममध्ये असताना शिवानी, शिव आणि दिगंबर या त्रिकूटानं लाईटचा खेळ केला. त्यामुळं बिचुकले खूप वैतागले. 


परागला सज्जड दम

त्यानंतर परागनं जेव्हा त्यांची थट्टा केली, तेव्हा बिचुकलेंचा राग अनावर झाला.  पोपटचा पिंजरा या टास्कमध्ये बिचुकलेंनी परागला नॉमिनेट केलं आणि त्यावरून पराग त्यांना वारंवार चिडवताना दिसणार आहे. 'साताऱ्यामध्ये परतीचे पेढे तयार ठेवा', अशा शब्दांत तो बिचुकलेंची टर उडवताना दिसणार आहे. या वाक्यामुळं बिचुकले यांना राग अनावर झाला आणि त्यांनी पराग यांना खडसावलं. 'या घरात कोण जाणार कोण जाणार ते तुम्ही नका ठरवू...' अशा कडक शब्दांत त्यांनी परागला जणू सज्जड दमच दिला.हेही वाचा -

EXCLUSIVE : शनाया बनली स्कूबा डायव्हर

‘बिग बॉस’मध्ये अर्थाचा अनर्थ!
संबंधित विषय
ताज्या बातम्या