Advertisement

‘बिग बॉस’मध्ये अर्थाचा अनर्थ!

दैनंदिन जीवनात बऱ्याचदा आपल्याला बोलायचं असतं भलतंच, पण समोरचा मात्र वेगळाच अर्थ काढतो आणि त्यातून गैरसमज निर्माण होतात. ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या पर्वातील सदस्यांमध्येही असाच अर्थाचा अनर्थ होत असल्याचं पहायला मिळत आहे.

‘बिग बॉस’मध्ये अर्थाचा अनर्थ!
SHARES

दैनंदिन जीवनात बऱ्याचदा आपल्याला बोलायचं असतं भलतंच, पण समोरचा मात्र वेगळाच अर्थ काढतो आणि त्यातून गैरसमज निर्माण होतात. ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या पर्वातील सदस्यांमध्येही असाच अर्थाचा अनर्थ होत असल्याचं पहायला मिळत आहे.


सरप्राईज पॅकेज 

‘बिग बॉस’ मराठीमध्ये पहिल्या दिवसापासून अभिजित बिचुकले या व्यक्तीची चर्चा खूप रंगत आहे. केवळ घरातच नव्हे तर घराबाहेर असलेल्या प्रेक्षकांनाही या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वात सरप्राईज पॅकेज ठरलेले बिचुकले एंट्री केल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत आहेत. त्यांच्या संवादांमुळं प्रेक्षकांचं मनोरंजन होत असलं तरी बऱ्याचदा त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थही काढला जात असल्याचं पहायला मिळत आहे.

किचनमध्ये गंमतीशीर गोष्ट 

अगदी पहिल्या दिवसापासूनच कधी बिचुकलेंच्या बोलण्याचा वेगळाच अर्थाचा काढला गेला, तर कधी त्यांचं म्हणणंच कुणाला कळालं नाही. त्यामुळं घरातील सदस्यांच्या मनात त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण झाले. बिचुकले आपल्या बोलण्यातून कधी कधी गोष्टीत गंमत आणण्याचा प्रयत्न करतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या आजच्या भागात अशीच एक गंमतीशीर गोष्ट किचनमध्ये घडल्याचं पहायला मिळणार आहे.


 बिचुकलेंना टोमणा

रुपाली भोसले किचनमध्ये जेवण बनवत असताना कुकरमध्ये पाणी जास्त झालं आणि ते बाहेर येऊ लागलं. याचा संदर्भ बिचुकले यांनी स्वत:शी जोडला. कुकरला माझं बोलणं सहन झालं नाही, तर तुला कसं होईल,  असं बिचुकले रुपालीला म्हणाले. त्यावर शिवनंही बिचुकलेंना टोमणा मारला कि, तुमच्या बोलण्यावर धिंगाणा झाला तर... तुम्ही बोलता काय नी होतं काय. त्यावर बिचुकले यांनीही शिवला उत्तर देत म्हटलं की, प्रेशर कुकर असूनही त्याला माझं प्रेशर सहन होत नाही, तर माणसांना कसं होईल?



हेही वाचा  -

हर्षदा बनली पोलिस अधिकारी

दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये रजनीकांतच शिखरावर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा