Advertisement

दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये रजनीकांतच शिखरावर

रजनीकांत यांची लोकप्रियता एवढी आहे की, त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने 'थलायवा' असं म्हणतात. या प्रेमामुळंच नुकत्याच समोर आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टमध्ये रजनीकांत लोकप्रितेच्या शिखरावर आहेत.

दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये रजनीकांतच शिखरावर
SHARES

रजनीकांत यांची लोकप्रियता एवढी आहे की, त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने 'थलायवा' असं म्हणतात. या प्रेमामुळंच नुकत्याच समोर आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टमध्ये रजनीकांत लोकप्रितेच्या शिखरावर आहेत.


१०० पैकी १०० 

२०१८-२०१९ मध्ये रजनीकांत यांचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. यात 'काला', '२.०' आणि 'पेटा' या तीन चित्रपटांचा समावेष आहे. या दरम्यान प्रकाशित झालेल्या न्यूजमध्ये ५४४७ अंकांसह रजनीकांत दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये अग्रेसर असल्याचं चित्र समोर आलं आहे. मागील सहा महिन्यांमधल्या रँकिंगनुसार १०० पैकी १०० गुणांसह रजनीकांत लोकप्रियतेत अग्रणी असल्याचं दिसतं. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीनं लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी जाहिर केली आहे.


प्रभास तिसऱ्या क्रमांकावर 

लोकप्रियतेच्या या चार्टमध्ये मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन ४२२३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. १०० मधून ७७.५३ गुण मिळवून पृथ्वीराज आपल्या चाहत्यांच्या प्रेमाच्या बळावर स्कोर ट्रेंड्सच्या लोकप्रियतेच्या चार्टवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ३८२९ गुणांसह बाहुबली फेम प्रभास लोकप्रियतेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.  बाहुबलीनंतर प्रभासची लोकप्रियता दक्षिणमध्येच नाही, तर बॉलीवूडमध्येही वाढली आहे. त्यामुळंच त्याच्या खात्यावर १०० पैकी ७०.३० गुण आहेत.


महेशबाबू चौथ्या स्थानी

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'महर्षी' चित्रपटाच्या बळावर ३४८९ गुणांसह महेशबाबू चौथ्या स्थानी विराजमान आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेला महेश बाबूचा 'भारत अने नेनू' टॉप ग्रॉसर चित्रपट ठरल्यामुळेही त्याच्या लोकप्रियतेत वाढ झालेली आहे. 'महर्षी'मुळे जगभरात महेशबाबूची फॅन फॉलोईग चांगलीच वाढली आहे. त्यामुळंच महेशबाबूनं १०० पैकी ६४.०५ गुण कमावले आहेत. सुपरस्टार मोहनलालच्या 'लुसिफर' आणि 'ओडियन' या दोन चित्रपटांनी चांगलीच कमाई केली आहे. त्यामुळंच ते ३२९४ गुणांसह पाचव्या स्थानी आहेत. त्यांनी १०० पैकी ६०.४७ गुण मिळवले आहेत.हेही वाचा -

#Metoo: दिग्दर्शक विकास बहलला क्लीन चीट
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा