Advertisement

#Metoo: दिग्दर्शक विकास बहलला क्लीन चीट

क्वीन चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल याच्यावर त्याच्याच एका महिला सहकर्मचाऱ्यानं लैंगिक छळाची तक्रर केली होती. मात्र, या लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमधून विकास बहल याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

#Metoo: दिग्दर्शक विकास बहलला क्लीन चीट
SHARES

क्वीन चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल याच्यावर त्याच्याच एका महिला सहकर्मचाऱ्यानं लैंगिक छळाची तक्रर केली होतीमात्रया लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमधून विकास बहल याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. रिलायन्सच्या अंतर्गत समितीनं विकास बहल याला क्लीन चीट दिली आहेत्यामुळं पुन्हा एकदा विकास बहल यांच नाव फॅन्टम फिल्म्सशी जोडण्यात येणार आहे.


कंपनीतून हकालपट्टी

दिग्दर्शक विकास बहल हा फँटम या कंपनीचा सहसंस्थापक आहेमात्रलैंगिक छळाचं आरोप झाल्यानंतर बहल याची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली होतीफँटम कंपनीची अर्धी मालकी रिलायन्सकडं असल्यानं रिलायन्सनं या आरोपांसंदर्भात चौकशी समिती नेमली होतीया चौकशी समितीनं विकास बहल याला क्लीन चीट दिली आहे.


'सुपर ३०'

विकास बहलअनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाणे यांनी फँटम या निर्मिती संस्थेची स्थापना केली होतीपरंतुलैंगिक छळाच्या आरोपानंतर विकास बहलचं नाव 'सुपर ३०या चित्रपटातून हटवण्यात आलं होतंचित्रपटात हृतिकची प्रमुख भूमिका होतीतसंचया प्रकरणी हृतिकनं ट्विट करून याबाबत योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.


लैंगिक छळाचा आरोप

या प्रकरणी विकास बहल यांच्यावर ज्या महिलेनं लैंगिक छळाचा आरोप केला होताती महिला फँटमची कर्मचारी नव्हतीमात्रया महिलेसोबत काही प्रकल्पांसाठी एकत्र काम केल्याचं बहल यांनी चौकशी समितीला सांगितलंत्याशिवाय, 'मला तिच्याशी चर्चा करायची आहेमाझ्या वागण्यानं तिला खरंच त्रास झाला असेलतर मला माफी मागायाची आहेअसंही बहल यांनी चौकशी समितीसमोर म्हटलं होतं

दरम्यानबहल यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेनं कुठंही रितसर तक्रार दाखल केली नव्हतीजेव्हा रिलायन्सच्या चौकशी समितीनं या महिलेला चौकशीसाठी बोलावलं होतंतेव्हा तिनं काहीही प्रतिसाद दिला नव्हतात्यानंतर आरोप करणाऱ्या महिलेची बाजू उचलून धरणाऱ्यांशी समितीनं चर्चा केली आणि या चर्चेनंतर बहल यांना अखेर क्लीन चीट देण्यात आली.हेही वाचा -

संविधानाच्या रक्षणासाठी भाजपाविरोधात इंच इंच लढू- राहुल गांधी

बेस्ट बसमध्येही बसवणार पॅनिक बटनRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा