Advertisement

बेस्ट बसमध्येही बसवणार पॅनिक बटन

बेस्टनं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि आपतकालीन परिस्थितीत प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी बेस्ट बसमध्ये 'पॅनिक बटन'चा प्रयोग केला जात आहे.

बेस्ट बसमध्येही बसवणार पॅनिक बटन
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण, बेस्टनं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि आपतकालीन परिस्थितीत प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी बेस्ट बसमध्ये 'पॅनिक बटन'चा प्रयोग केला जात आहे. बेस्ट उपक्रमातर्फे पॅनिक बटन बसमधील चालकाच्या केबिनमध्येच बसवण्यात आलं असून, त्याची चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळं बेस्टच्या प्रवाशांचा प्रवास आता आणखीनच सुखकर होणार आहे.


महिला प्रवाशांची छेडछाड

खासगी बस गाडीतून प्रवास करताना महिला प्रवाशांची छेडछाड, बलात्कार अशा घटना घडत असतात. त्यामुळं या घटनांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक वाहनांमध्ये पॅनिक बटन आणि व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्याचं केंद्र सरकारने १ जानेवारी २०१९ पासून अनिवार्य केले होतं. त्यानंतर, हा निर्णय नव्यानं नोंदणी होणाऱ्या वाहनांसाठी देखील लागू करण्यात आला. परंतु, केंद्र सरकारच्या नियमानुसार जानेवारीपासून नवीन नोंदणीकृत वाहनांनाच पॅनिक बटन बसवणं शक्य असल्यानं बेस्टनं 'आयटीएमएस'द्वारे (इंटीग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम) ही यंत्रणा सेवेत असलेल्या बस गाड्यांमध्ये बसविण्याचा निर्णय घेतला आहे.


प्रवाशांना तात्काळ मदत

बेस्ट बसमधून प्रवास करताना बेस्ट बस गाड्यांना आग लागणं, अपघात होणं घटना घडत असतात. त्यामुळं अशा आपत्कालीन परिस्थीत प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी बेस्ट उपक्रमानं बसमधील चालकाच्या केबिनमध्ये पॅनिक बटनची जागा निश्चित केली आहे. अशाप्रकारे बेस्टच्या प्रत्येक एका बसमध्ये एक पॅनिक बटन बसविण्यात येणार आहे. मात्र, सध्यस्थितीत एका बसमध्ये या नवीन यंत्रणेची चाचणी घेण्यात येत आहे. चालकानं बटन दाबताच बेस्टच्या नियंत्रण कक्षाला व पोलीस नियंत्रण कक्षाला त्वरित संदेश या यंत्रणेमार्फत जाणार आहे.



हेही वाचा -

एलपीजीच्या किंमतीत वाढ

तुम रिझर्व्ह कॅटेगरी से हो ना, असं म्हणत पायलचा जातीवाचक छळ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा