Advertisement

संविधानाच्या रक्षणासाठी भाजपाविरोधात इंच इंच लढू- राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाने निराश झालेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाविरोधात आपण ५२ खासदाराच पुरेसे असून, संविधानाच्या संरक्षणासाठी इंच इंच लढू, असा प्रेरणादायी मंत्र नवनिर्वाचीत काँग्रेस खासदारांना दिला.

संविधानाच्या रक्षणासाठी भाजपाविरोधात इंच इंच लढू- राहुल गांधी
SHARES

लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाने निराश झालेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाविरोधात आपण ५२ खासदाराच पुरेसे असून, संविधानाच्या संरक्षणासाठी इंच इंच लढू, असा प्रेरणादायी मंत्र नवनिर्वाचीत काँग्रेस खासदारांना दिला. शनिवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना राहुल यांनी पराभवाने आलेली सर्व मरगळ झटकून दिल्याचं दिसलं.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी संसदीय पक्षाच्या नेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली.  यावेळी खासदारांना उद्देशून केलेल्या भाषणात सोनिया गांधी म्हणाल्या की, काँग्रेसवर विश्वास दाखवून मतदान करणाऱ्या १२. १३ कोटी मतदारांचे मी आभार मानते. राहुल गांधी दूरदृष्टी असलेले नेते असल्याचं अनेक वृत्तवाहिन्यांनी म्हटलं. त्यांनी निवडणुकीत केलेल्या प्रचाराबद्दल त्यांचं अभिनंदन करते. 

तर, राहुल गांधी खासदारांना मार्गदर्शन म्हणाले, निवडणुकीतील पराजयाने खचून न जाता आपला लढा सुरूच ठेवा. आपण संविधानाच्या रक्षणासाठी लढा देत आहेत. जात, धर्म आणि वर्ण याचा विचार न करता आपण प्रत्येक भारतीयासाठी लढा देत आहेत, हे प्रत्येक काँग्रेस खासदाराने लक्षात ठेवावं. एकेकाळी ४०० जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे भलेही ५२ खासदार जिंकून आले असेल, तरी हे खासदार भाजपाविरोधात इंच इंच लढवण्यासाठी पुरेसे आहेत.



हेही वाचा-

भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांसाठी ‘ही’ नावे चर्चेत

मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष, सुधीर मुनगंटीवार यांची खोचक टीका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा