Advertisement

मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष, सुधीर मुनगंटीवार यांची खोचक टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे दुर्मिळ प्रजातीचा पक्ष असल्याची खोचक टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली. मनसेला महाआघाडीत सामावून घेण्यासाठी सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू असल्याने त्यावर मत नोंदवताना मुनगंटीवार यांनी ही

मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष, सुधीर मुनगंटीवार यांची खोचक टीका
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे दुर्मिळ प्रजातीचा पक्ष असल्याची खोचक टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली. मनसेला महाआघाडीत सामावून घेण्यासाठी सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू असल्याने त्यावर मत नोंदवताना मुनगंटीवार यांनी ही टीका केली.

भाजपावर प्रहार

लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच गाजलं होतं. आपल्या प्रचारसभांमधून राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या जोडगोळीवर घणाघाती प्रहार केले. या दोघांना भारतीय राजकारणातून बाहेर काढण्यासाठी मतदारांना आवाहन केलं. 

राज्यात युतीला टक्कर देताना मतविभागणी होऊ नये, म्हणून मनसेने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे न करताच भाजपाविरोधात प्रचार केला. प्रसंगी काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार उभे असलेल्या ठिकाणी जाऊन सभाही घेतल्या. ‘लाव रे तो व्हिडिओ’ या राज यांच्या वक्तव्यामुळे सगळ्या सभा चांगल्याच गाजल्या. परंतु सभेला जमलेल्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होऊ शकलं नाही.

भूमिका बदलली

मात्र या सभांनी भाजपाच्या पायाखालची वाळू सरकते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी मनसेच प्रमुख विरोधी पक्ष असल्याचा आभास तयार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही विरोध पक्ष सोडून मनसेवर पलटवार केले. त्यातच विधानसभा निवडणूक तोडावर आलेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलून मनसेला महाआघडीत सामावून घेण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

राज यांनी विकासावर बोलावं

त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा नाही, निवडणूक लढवायची नाही, केवळ बाहेरुन टीका करत रहायची हीच आता मनसेची ओळख बनली आहे.  राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्यावर टीका करण्यापेक्षा विकासाबाबत बोललं, तर बरं होईल, असं वक्तव्यही मुनगंटीवार यांनी केलं. 



हेही वाचा-

मनसे स्वबळावर लढवणार विधानसभा?

रेल्वे खातं मागणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग, सावंत झाले नाराज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा