Advertisement

मनसे स्वबळावर लढवणार विधानसभा?

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे महाआघाडीत सामील होईल, अशा अटकळी लागत असतानाच राज येणारी निवडणूक स्वबळावर लढवतील, अशा बातम्याही जोर धरू लागल्या आहेत.

मनसे स्वबळावर लढवणार विधानसभा?
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीपाठोपाठ काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे राज यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात महाआघाडीविषयी चर्चा रंगायला लागली. आधी मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्यास नकार देणारी काँग्रेस नरमल्याचंही म्हटलं जाऊ लागलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे महाआघाडीत सामील होईल, अशा अटकळी लागत असतानाच राज येणारी निवडणूक स्वबळावर लढवतील, अशा बातम्याही जोर धरू लागल्या आहेत.  

भूमिका मवाळ

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या महायुतीला टक्कर देण्यासाठी मनसेलाही महाआघाडीत सामील करून घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने मांडण्यात आला होता. परंतु काँग्रेसने मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे राज ठाकरे यांनी लोकसभेत मतांचं विभाजन होऊ नये म्हणून एकही उमेदवार उभा न करताच मोदी शहांविरोधात प्रचार केला. राज यांनी केलेल्या प्रचाराचा फायदा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला झाला नसला, तरी मनसेबाबत काँग्रेसची भूमिका मवाळ झाल्याचं दिसत आहे.  

जागा सोडल्या

त्यामुळेच आधी राज ठाकरे आणि शरद पवार आणि त्यानंतर राज-माणिकरावांच्या भेटीनंतर मनसे महाआघाडीत सामील होईल, या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसने मनसेला २० ते २५ जागा सोडण्याची तयारी दाखवल्याचीही चर्चा आहे.    

आंध्र फाॅर्म्युला

असं असलं, तरी राज ठाकरे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी ज्याप्रकारे कुठल्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवत १७५ पैकी १५० जागा जिंकल्या. त्याचप्रमाणे राज्यात स्वबळावर निवडणूक लढवून सत्ता काबीज करण्याची राज यांची इच्छा असल्याचं समजत आहे.  



हेही वाचा-

माेदी मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री, तर सीतारमण अर्थमंत्री

रेल्वे खातं मागणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग, सावंत झाले नाराज



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा