हर्षदा बनली पोलिस अधिकारी

घाडगे सदनात नव्या संकटाची चाहूल लागली आहे. कारण सौदामिनी नावाच्या व्यक्तिरेखेची एन्ट्री या मालिकेत होणार आहे. हर्षदा खानविलकर ही भूमिका साकारणार आहे.

  • हर्षदा बनली पोलिस अधिकारी
SHARE

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात चित्रपट, नाटक आणि मालिका असा ताळमेळ साधत करियर घडवणारी मराठमोळी अभिनेत्री हर्षदा खानविलकर मागील काही वर्षांपासून मालिकाविश्वातच रमली आहे. आता ती पोलिस आधिकाऱ्याच्या भूमिकेत समोर येणार आहे.


नव्या संकटाची चाहूल

'घाडगे & सून' ही मालिका सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. नाट्यमय वळणांमुळे प्रेक्षकांमध्येही या मालिकेबाबत कायम उत्सुकता असते. अनोखं शीर्षक आणि उत्कंठावर्धक कथानक असणारी ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. घाडगे सदनात नव्या संकटाची चाहूल लागली आहे. कारण सौदामिनी नावाच्या व्यक्तिरेखेची एन्ट्री या मालिकेत होणार आहे. हर्षदा खानविलकर ही भूमिका साकारणार आहे. तेव्हा सौदामिनी कडकडेच्या मालिकेत येण्याने मालिका कुठल्या वेगळ्या वळणावर येईल हे बघणं रंजक असणार आहे. 


कियाराच्या कारस्थानांनी त्रस्त

हर्षदा या मालिकेत पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत असं कोणतं गूढ दडलं आहे ज्याचा शोध घेण्यासाठी हर्षदा पोलिस अधिकारी बनली आहे ते लवकरच समजेल. 'घाडगे & सून' मालिकेमध्ये सध्या संपूर्ण घाडगे कुटुंब कियाराच्या कारस्थानांनी आणि डावपेचांनी त्रस्त झालं आहे. या सगळ्यामध्ये अमृता आणि माई मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. परंतु प्रत्येक वेळी कियाराची खेळी मात्र सगळ्यांना भारी पडत आहे. तिचा खोटेपणा, गरोदर असल्याचं सांगण, घाडगे परिवाराला तिच्या वडिलांनी ब्लॅकमेल करणं, धमक्या देणं हे सर्व प्रेक्षकांनाही पेचात टाकणारं आहे.


सत्य समजलं

अशातच कियारानं अक्षयला आपण भारताबाहेर जाऊ आणि घाडगे सदनाला कायमचा रामराम ठोकू असं सांगणं. त्यामुळं अक्षय द्विधा मनस्थितीत असणं या घटना सध्या मालिकेत घडत आहेत. आता अक्षय आणि कियारा घर सोडून दुबईला जाणार हे सत्य अमृता आणि घरच्यांना देखील समजलं आहे. अमृता या सगळ्यामधून काय आणि कसा मार्ग काढेल हे पहायचं आहे. त्यात हर्षदाची एंट्री झाल्यानं 'घाडगे & सून' या मालिकेत कोणती परिस्थिती उद्भवणार आहे ते देखील पहाणं रंजक ठरणार आहे.हेही वाचा -

#Metoo: दिग्दर्शक विकास बहलला क्लीन चीट
संबंधित विषय
ताज्या बातम्या