EXCLUSIVE : शनाया बनली स्कूबा डायव्हर

रसिकानं पाठवलेल्या संदेशात असं म्हटलं आहे की, मी सर्टिफाईड ओपन वॅाटर स्कूबा डायव्हर बनले आहे. मला आता जगातल्या कोणत्याही डाइव्ह साईटवरून डाईव्ह करण्याचं सर्टिफिकेट आणि लायसन्सही मिळालं आहे.

  • EXCLUSIVE : शनाया बनली स्कूबा डायव्हर
  • EXCLUSIVE : शनाया बनली स्कूबा डायव्हर
  • EXCLUSIVE : शनाया बनली स्कूबा डायव्हर
SHARE

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनाया ही व्यक्तिरेखा साकारणारी रसिका सुनील एखाद्या चित्रपटासाठी स्कूबा डायव्हर बनल्याचं कदाचित शीर्षक वाचल्यावर वाटेल, पण तसं नाही. ती वास्तवात स्कूबा डायव्हर बनली आहे.


इच्छा पूर्ण

शनाया म्हटली की, झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत पूर्वी गुरू सुभेदारची गर्लफ्रेंड बनलेली रसिका आठवते. या मालिकेतील निगेटीव्ह भूमिकेतही रसिकानं आपला ठसा उमटवत वेगळा चाहता वर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय 'पोश्टर गर्ल' या चित्रपटातील तिची 'कशाला लावतोस नाट...' ही लावणी आणि 'बस स्टॅाप' चित्रपटातील मुख्य भूमिकाही लक्ष वेधून घेणारी ठरली. याच रसिकाच्या बकेट लीस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली आहे. ती स्कूबा डायव्हर बनली आहे.


डाईव्ह करण्याचं लायसन्स

सध्या अमेरिका मुक्कामी असलेल्या रसिकानं सूत्रांच्या माध्यमातून 'मुंबई लाइव्ह'पर्यंत ही आनंदाची बातमी पोहोचवली आहे. रसिकानं पाठवलेल्या संदेशात असं म्हटलं आहे की, मी सर्टिफाईड ओपन वॅाटर स्कूबा डायव्हर बनले आहे. मला आता जगातल्या कोणत्याही डाइव्ह साईटवरून डाईव्ह करण्याचं सर्टिफिकेट आणि लायसन्सही मिळालं आहे.

स्कूबा डायव्हींगच्या माध्यमातून समुद्राच्या तळाशी जायची इच्छा बऱ्याच वर्षांपासून माझ्या बकेट लीस्टमध्ये होती. ती पूर्ण झाली आहे. यासाठी मी रीतसर प्रशिक्षण घेतलं आहे. स्कूबा डायव्हींग हा एक जबाबदार खेळ असून, यात सुरक्षिततेसाठी सायन्स आणि तंत्रज्ञानाची सांगड घातली जात असल्याची जाणीव झाली मला प्रशिक्षण घेताना झाली. आता मीदेखील हा खेळ शिकल्याचा खूप आनंद होत आहे, पण हे वाटतं तितकं सोपं मात्र नक्कीच नाही.


समुद्रातील निसर्गसौंदर्य 

समुद्रात खोलवर जाऊन डायव्हींग करण्याबाबतच्या अनुभवाबाबत रसिका म्हणाली की, पॅसिफीक महासागरातील पाणी खूप खूप थंड असतं. स्कूबा डायव्हिंग करताना सुरक्षिततेसाठी आपल्याला हुड वेस्ट, ७ मिलीमिटर जाड सूट, ग्लोव्हज, बूट आदी बऱ्याच गोष्टी परिधान कराव्या लागतात. पाण्याखाली तापमान ८ डिग्री सेल्सिअसपर्यंतही थंड असू शकतं. अशा परिस्थितीत पाण्यात आपलं शरीर गरम राहणं गरजेचं असतं... पण पाण्याखालचं सौंदर्य काही औरच असतं. मासे, मोठे स्टार मासे, शीपहेड्स, जलवनस्पती, खेकडे, सी अर्चिन्स आणि बरंच काही... समुद्रातील हे निसर्गसौंदर्य मन प्रसन्न करतंच, पण अविस्मरणीय क्षण देतं.हेही वाचा -

‘बिग बॉस’मध्ये अर्थाचा अनर्थ!

हर्षदा बनली पोलिस अधिकारी
संबंधित विषय
ताज्या बातम्या