आलिशान गाड्यांमधून केली जायची ड्रग्ज तस्करी, आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा

रियाने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने भूमिगत झालेल्या अनेक ड्रग्ज तस्करांची धरपकड सुरू केली.

आलिशान गाड्यांमधून केली जायची ड्रग्ज तस्करी, आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा
SHARES

सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने धरपकड सुरू केली आहे. शनिवारी पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली. करमजीत सिंह, ड्वेन फर्नांडिस, संकेत पटेल, अंकुश अनरेजा, संदीप गुप्ता, आफताब फतेह अन्सरी अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या चौकशीतून मुंबईच्या रस्त्यांवर ड्रग्जची तस्करी रण्यासाठी त्यांनी आलिशान कारचाच वापर केल्याची माहिती दिली आहे.  

हेही वाचाः- Mumbai rains: मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, सर्वत्र ढगाळ वातावरण

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसिंग राजपूतला कुठे  आणि कुणी मादक पदार्थांच्या व्यसनाची सवय लागली याचा खुलासा रिया चक्रवर्तीने केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यात २५ सेलिब्रिटींचीही नावे पुढे आली आहेत. बॉलिवूडच्या  एका दिग्दर्शकामुळे सुशांतला नशेची लत लागल्याची माहिती रियाने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. ती व्यक्ती वेळोवेळी सुशांतला अशा पार्टीमध्ये घेऊन जायची. ज्या पार्टीत ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जायचे, त्या पार्टीत सुशांत कोकेन, गांजा, एलएसजी या पदार्थाचे सेवन करायचा. सुशांतने रियाला याबाबत सांगितले होते, बाॅलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी या ड्रग्जच्या व्यसनात अडकलेले आहेत. रियाने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने भूमिगत झालेल्या अनेक ड्रग्ज तस्करांची धरपकड सुरू केली.  सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीने नुकतीच करण जीत सिंह आनंद (२३) याला दादर येथून अटक केली आहे. त्याच्याजवळून एनसीबीने गांजा आणि चरस हे अंमली पदार्थ तपास अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. त्याच्या चौकशीतून पुढे अंकुश अर्नेजा आणि अनुज केशवानी याला अटक करण्यात आली आहे. हे तिघेही ड्रग्ज तस्करीसाठी सक्रीय होते. आनंदकडून ५०० ग्रॅम, तर उर्वरित दोन आरोपींकडून ४२ ग्रॅमचे  चरस आणि १२ हजार रुपये तपास अधिकाऱ्यांनी हस्तगत केले आहेत.

हेही वाचाः- सर्वसामान्य रेल्वेतून करू शकतात प्रवास? लवकरच निर्णय होण्याची शक्यता

वरील सहा आरोपींमधील अंकुश कनरेजा हा एका हाॅटेल व्यावसायिकाचा मुलगा आहे. याशिवाय करमजीत आनंद उर्फ केजे दोघेही मोठे ड्रग्ज वितरक आहे. यातील अनरेजाकडून एनसीबीने महागडी कारही जप्त केली आहे. या कारमधूनच ते ड्रग्जची तस्करी करत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. यातील केजेनेचं सुशांतला अंधेरीतील क्लबमध्ये गांजा पुरवल्याचे तपासात निश्पन्न झाले आहे. तसेच रियाच्या सांताक्रूझ येथील घरी व सुशांतच्या वांद्रे येथील घरीही केजेने अंमली पदार्थ पोहचवल्याचे प्राथमिक तपासात निश्पन्न झाले आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा