Advertisement

Mumbai rains: मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, सर्वत्र ढगाळ वातावरण


Mumbai rains: मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, सर्वत्र ढगाळ वातावरण
SHARES

मुंबईत सोमवारी सकाळी पावसानं चांगली हजेरी लावली. त्यामुळं मागील आठवड्याभरापासून उकाड्याचा सामना करत असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून मुंबई आणि परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने मुंबईकरांना थोडाफार दिलासा मिळाला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मुंबई जिल्ह्यात पुन्हा आगमन केलं आहे. 

पावसाच्या हजेरीनंतर उकड्याचा त्रास कमी झाला आहे.   राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही आयएमडीने व्यक्त केला आहे. यंदाचा पाऊस हा मध्ये मध्ये विश्रांती घेत पडतो आहे. परतीला निघालेला हा मान्सून असल्याचंही म्हटलं जात आहे. काही का असेना उष्ण व दमट हवामानात गारवा निर्माण झाला, तरी मुंबईकरांसाठी हे पुरेसं ठरेल.

याआधी आॅगस्ट महिन्यात मुंबईकरांनी मुसळधार पावसाचा अनुभव घेतला. एवढंच नाही, तर आॅगस्टमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने १९५८ पासूनचे  मागचे अनेक विक्रम मोडीत काढले. आॅगस्ट १९५८ मध्ये सांताक्रूझ वेधशाळेने १२५४ मिमी पावसाची नोंद केली होती. परंतु आॅगस्ट २०२० मध्ये १,२४८ मिमी पावसाची नोंद करताना अवघा ६.३ मिमी पाऊस हा विक्रम मोडण्यासाठी कमी पडला. मात्र या पावसाने आॅगस्ट १९८३ मधील १२४४ मिमी पावसाचा विक्रम मोडीत काढला.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा