सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती एनसीबीच्या ताब्यात


सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती एनसीबीच्या ताब्यात
SHARES

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्यासाठी सध्या NCB ची टीम मुंबईमध्ये दाखल झाली आहे. आज सकाळी या टीमकडून  सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या घरावर छापा टाकून झाडाझडती केल्यानंतर दोघांनाही समन्स बजावत ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांची संध्या चौकशी सुरू आहे. 

हेही वाचाः- ‘त्या’ आरोपींचा कोरोना अहवाल आला पाॅझिटिव्ह

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे व्हाॅट्स अॅप चॅट समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्याही चॅटमध्ये सुशांतला ड्रग्ज देण्यावरूनचे संभाषण आहे. हे चॅट उघडकीस येताच  एनसीबीच्या पथकांनी सूत्रे हालवून शुक्रवारी पहाटेच दोघांना काही समजायच्या आत ताब्यात घेतले. ऐवढ्यावरच न थांबता. एनसीबीने दोघांच्या घरांची झडतीही घेतली. या झाडतीत एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले असल्याचे कळते.  दरम्यान एनसीबीच्या टीमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज सकाळी NDPS Act एमडीपीआरएस अॅक्ट हा अंतर्गत छापा टाकण्यात आला आहे. Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985 अंतर्गत सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- Exclusive ‘त्या’ अश्लील फोनला कंटाळून ती करणार होती आत्महत्या, सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

दरम्यान मुंबईमध्ये यापूर्वी उच्चभ्रूंना ड्रग्सचा पुरवठा करण्याचा प्रकरणामध्ये चार जणांना अटक झाली आहे. ही कारवाई NCB कडून करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रिया, शौविक यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सची तपासणी झाली होती. त्याच्यामध्ये ड्रग्ज कनेक्शनचे धागेदोरे मिळाले होते. तसेच ईडीच्या चौकशीमध्येही त्याचे संदर्भ आल्याने आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला वळण मिळाले आहे. दरम्यान मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीत ताब्यात असलेल्यांपैकी एकाने सॅम्युअल मिरांडाचं नाव घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सॅम्युअल शौविकच्या आदेशावरून ड्रग्जची जुळवाजुळव करत होता.अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये रिया सुशांतचा विष देत होती. तिच खुनी आहे असा आरोप देखील केला आहे. सध्या सीबीआय सोबतच  ईडी आणि एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणा सुशांंतच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी काम करत आहेत. तर मुंबई पोलिस  त्यांना मदत करत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा