Advertisement

इतरांनाही लोकल ट्रेनमधून प्रवासास मुभा?


इतरांनाही लोकल ट्रेनमधून प्रवासास मुभा?
SHARES

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच राज्य सरकार लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी आणखी काही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मुभा देऊ शकते. सध्या फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्यांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी COVID 19 टास्क फोर्सशी यासंदर्भात चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना रेल्वेशी समन्वय साधत पुढील योजना आखण्यास सांगितलं आहे. पण यासोबतच पूर्ण काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत. यापूर्वीही मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून असं म्हटलं गेलं होतं की, ते मर्यादित कालावधीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अधिक गाड्या चालवण्याच्या विचारात आहेत.

आतापासून दोन प्रकारच्या खासगी कंपन्या जसं की वीज कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना आणि विमानांच्या देखभालीचं काम करणाऱ्यांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध असतील.

दरम्यान, मुंबई हायकोर्टानं यापूर्वी उद्धव ठाकरे सरकारला विचारलं होतं की, कोरोना साथीच्या आजारात लोकल ट्रेन सेवा किती काळ मर्यादित ठेवण्याची योजना आहे? एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा प्रश्न केला होता. वकिलांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.

इतकंच नव्हे तर सूत्रानुसार लोकल गाड्या देखील सम-विषम या पद्धतीनं चालवल्या जाऊ शकतात. म्हणजेच, पहिल्या तारखेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिसर्‍या तारखेला एक दिवस वगळता प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तर दुसर्‍या तारखेला प्रवास करणारे प्रवासी चौथ्या तारखेला प्रवास करण्यास पात्र ठरणार आहेत. या प्रणालीमुळे गाड्यांमधील गर्दी कमी होईल.

नुकतीच नालासोपारा रेल्वे स्थानक, विरार रेल्वे स्थानक आणि बोरिवली रेल्वे स्थानकांवर लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळावी या मागणीसाठी प्रवाशांना रेलरोको केला होता.



हेही वाचा

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा!

किती दिवस लोकल बंद ठेवणार? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा