Advertisement

Central railway मध्य रेल्वेची मालवाहतूक सेवा अद्याप सुरूच

उद्योगांच्या गरजा भागविण्यासाठी मध्य रेल्वेने २३ मार्च २०२० ते ३ सप्टेंबर २०२० पर्यंत १६५ दिवसात २२.२८६ दशलक्ष टन मालवाहतूक यशस्वीरित्या केली.

Central railway मध्य रेल्वेची मालवाहतूक सेवा अद्याप सुरूच
SHARES

उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वेळेवर मालवाहतूक खात्रीने करण्यासाठी, रेल्वेनं कोरोनामुळं लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत. उद्योगांच्या गरजा भागविण्यासाठी मध्य रेल्वेने २३ मार्च २०२० ते ३ सप्टेंबर २०२० पर्यंत १६५ दिवसात २२.२८६ दशलक्ष टन मालवाहतूक यशस्वीरित्या केली.

मध्य रेल्वेने २३ मार्च ते ३ सप्टेंबर या १६५ दिवसांत कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची ८ हजार ८९९  मालगाड्यांच्या माध्यमातून ४,२४,९३१ वॅगन्सची मालवाहतूक केली. या कालावधीत दररोज सरासरी २ हजार ५७५ वॅगन्सची मालवाहतूक भारीत(लोडींग) केली गेली.

मध्य रेल्वेने अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविध वीज प्रकल्पांना उपरोक्त कालावधीत  १,६०,००२ वॅगन कोळसा लोड केले आहेत. शेतकर्‍यांच्या हितासाठी २,६३४ अन्नधान्याचे वॅगन्स, २,२१३ साखरेचे वॅगन्स, १९,९२१ खतांचे वॅगन्स आणि ६,१९२ कांद्यांचे वॅगन्स; पेट्रोलियम पदार्थांचे ४२,०२९ वॅगन्स; लोह आणि स्टीलच्या ११,२९७ वॅगन्स; सिमेंटच्या २७,३०१ वॅगन्स, कंटेनरच्या १,३२,१०५ वॅगन्स आणि डी-ऑईल केक आणि इतर वस्तूंच्या सुमारे २१,२३७ वॅगन्स  देखील लोड करण्यात आल्या.

मालवाहतुकीच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी रेल्वे कर्मचारी २४/७ तत्वावर विविध गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांत काम करत आहेत. लोको पायलट, गार्ड कुशलतेने गाड्या चालवत आहेत.  ट्रॅक, सिग्नलिंग, ओव्हरहेड उपकरणे, लोकोमोटिव्ह्ज, डब्बे आणि वॅगन्सचे मुख्य देखभाल करणारे कर्मचारी गाड्यांची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधा चांगल्या स्थितीत राखत आहेत. पुरवठा साखळी अखंड ठेवणारे ते प्रत्यक्ष फील्डवरील कोरोना योद्धा आहेत.



हेही वाचा -

मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता

लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे! विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा