Advertisement

मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता

मुंबईत गेल्या ५ दिवसांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयातील ५२८ खाटांपैकी ३८ खाटा उपलब्ध आहेत.

मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता
SHARES

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत खाटांची उपलब्धता कमी होत असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या ५ दिवसांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयातील ५२८ खाटांपैकी ३८ खाटा उपलब्ध आहेत.

महापालिका प्रशासनाच्या रुग्णालयांमध्ये ८७१ खाटांपकी १०३ उपलब्ध आहेत. मागील १५ दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजारांवरून २२ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळं खासगी रुग्णालयं असो वा महापालिका रुग्णालय, कोविड केंद्र येथील खाटांची क्षमता अपुरी पडत असल्याची माहिती मिळते. भाटिया रुग्णालयात १०० खाटांची क्षमता पूर्ण झाल्यानं २० रुग्ण सामान्य विभागासाठी, तर १५ रुग्ण अतिदक्षता विभागातील खाटांसाठी प्रतीक्षेत आहेत. खाटांच्या उपलब्धतेविषयी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं.

खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील खाटांचा प्रश्न कळीचा झाला आहे. परंतु, पालिकेच्या रुग्णालयांमध्ये या खाटा उपलब्ध आहेत. शिवाय, महालक्ष्मी आणि नेस्को या २ मोठ्या कोविड केंद्रांमध्ये पुढील २ दिवसांत २५० खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या तयारीनुसार, शहर-उपनगरात १ हजार ३९९ अतिदक्षता खाटा आहे. त्यातील १ हजार २५८ खाटांवर रुग्ण दाखल झाल्यानं केवळ १४१ खाटा उपलब्ध असल्याचे दिसून येते आहे. परिणामी वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. याशिवाय, ९३१ व्हेंटिलेटर खाटा असून त्यातील ४३ खाटा उपलब्ध आहेत.



हेही वाचा -

इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षविना पार पडणार अधिवेशन

मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित, पाराही चढला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा