Advertisement

इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षविना पार पडणार अधिवेशन

नाना पटोले यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळं विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षविना अधिवेशन पार पडणार आहे.

इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षविना पार पडणार अधिवेशन
SHARES

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व आमदार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश असून, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवा, नाना पटोले यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळं विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षविना अधिवेशन पार पडणार आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना क्वारंटाईन करण्यात आल्यानं ते घराबाहेर पडू शकणार नाहीत. आतापर्यंत अधिवेशनाच्या काळात १-२ दिवस अध्यक्ष आले नाहीत, असं घडल्याची माहिती आहे. मात्र, पूर्ण अधिवेशन काळात अध्यक्ष आलेच नाहीत, असे याआधी कधीही घडलं नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज साहित्य दिलं जात आहे. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरण्याची सूचना देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीकोनातून ही चाचणी केली जात आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यानं ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळं उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडत आहे. याबाबत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली. सभागृहतील बैठक व्यवस्थाही बदलली आहे. एका सदस्यानंतर दोघांची जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळं काही जणांना प्रेक्षक गॅलरीत देखील बसवण्यात आल्याची महिती मिळते.



हेही वाचा -

अधिवेशनात सहभागी होणाऱ्यांची कोरोना चाचणी

मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित, पाराही चढला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा