केंद्रीय गृहखात्याकडून कंगना रणौतला Y दर्जाची सुरक्षा

. कंगना राणावत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध तीव्र झाले होते. संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला. यावर कंगनाने मुंबईत येणारचं असे ठणकावून सांगितले होते.

केंद्रीय गृहखात्याकडून कंगना रणौतला Y दर्जाची सुरक्षा
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांना वाय श्रेणीची सुरक्षा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. कंगना रनौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध तीव्र झाले होते. संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला. यावर कंगनाने मुंबईत येणारचं असे ठणकावून सांगितले होते. या वादामुळे शहरात कंगनाच्या जिवाला असलेला धोका आणि शहरात कायदा व सुव्यवस्था उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता ही सुरक्षा पुरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचाः- मातोश्री बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, दुबईतून आले ४ फोन काॅल

अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद थांबताना दिसत नाहीय. संजय राऊत यांच्या प्रत्येक टीकेला कंगनाने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना कंगना रनौतने मुंबई शहराची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केली होती. त्यावरून कंगनाला नागरिकांनी सोशल मिडियावर ट्रोल केलं होत. पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार परवेश साहीब सिंग यांच ट्वीट रिट्वीट करत, कंगनानं आव्हान दिलं की, "मुंबईत न येण्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत. पण आता मी ठरवलंय की, पुढच्याच आठवड्यात म्हणजे ९ सप्टेंबरला मुंबईत यायचं. मुंबई विमानतळावर पोहोचण्याची वेळही मी इथे पोस्ट करेन. कुणाच्या बापात हिंमत असेल, तर मला थांबवून दाखवावं." कंगनाच्या या आव्हानाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं, "मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांना त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही," अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनाला उत्तर दिलं.


अशात कंगना जर ९ सप्टेंबरला मुंबईत आली. तर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच कंगनाच्या जिवाला ही धोका होऊ शकतो. त्यामुळेच कंगनाला सुरक्षा मिळावी, अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश सरकारने तिला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान केंद्रीय गृहखात्याने आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. या सुरक्षेत तिच्या संरक्षणासाठी ११ सैनिक तैनात असतील. त्यात एक-दोन कमांडो आणि उर्वरित पोलिस असतील. असे सांगितले जात आहे की ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईला पोहोचेल तेव्हा तिला वाय वर्ग सुरक्षा मिळेल.

हेही वाचाः- IPL २०२० चं वेळापत्रक जाहीर, मुंबई-चेन्नईत ‘या’ दिवशी ओपनिंग मॅच

वाय श्रेणीची सुरक्षा मिळाल्यानंतर कंगना रनौतने एक ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.  त्या ट्विटमध्ये तिने ‘कोणताही फासीवादी कोणत्याही देशभक्त आवाजाला चिरडू शकत नाही याचा पुरावा आहे, अमित शहाजींचे मी आभारी आहे. परिस्थितीमुळे काही दिवसांनी त्यांनी मला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला असता, परंतु त्यांनी भारताच्या मुलीचे शब्द पाळले, आमचा स्वाभिमान आणि स्वाभिमान, जय हिंद याचा आदर केला.” अशा आशयाचे ट्विट केले आहे.  कंगना मुंबईत येण्यावर ठाम असल्यामुळे मुंबई पोलिसांच्याही डोकेदुखीत वाढ झाली आहे. कंगना मुंबईत आल्यानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे पोलिसांनी तिच्या खार येथील घराबाहेर ती येण्यापूर्वी चाचपणी सुरू केली असल्याचे कळते.  

हेही वाचाः- धोका वाढला! महाराष्ट्रात दिवसभरात सर्वोच्च २३,३५० नव्या रुग्णांची नोंद, ३२८ जणांचा मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा