Advertisement

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री 'निम्मी' यांचं निधन

काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मुंबईत आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री 'निम्मी' यांचं निधन
SHARES

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री निम्मी यांचं  25 मार्च 2020 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. 

19930 मध्ये जन्मलेल्या नवाब बानो उर्फ निम्मी यांचं भारतीय चित्रपटसृष्टीत मोठं योगदान आहे. 1950 आणि 1960 च्या दशकात निम्मी यांनी बरेच हिट चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला दिले. चित्रपटात साकारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यापैकी बऱ्याच भूमिका त्या गावातल्या मुलीच्या किंवा महिलेच्या साकारायच्या. आम, पूजा के पुजूल, मेरे मेहबूब, आकाशदीप इत्यादी त्यांचे चित्रपट लोकप्रिय होते.

1949 साली आलेल्या बरसात या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांना बर्‍याच चित्रपटांची ऑफर आली. अभिनयाच्या अनोख्या शैलीसाठी निम्मी ओळखली जात होती.  त्यांचा एक विश्वासू चाहता वर्गही निर्माण केला होता.

देव आनंद, राज कपूर यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं. चित्रपटसृष्टीतल्या मोठ्या कलाकारांमध्ये त्यांची गिनती केली जायची. निम्मीदेखील सूरय्या, गीता बाली, मधुबाला, मीना कुमारी आणि इतर अनेक चित्रपटांचा एक भाग होती.

1951 आणि 1952 मध्ये आलेल्या दीदार आणि डागमध्ये काम केल्यावर निम्मी यांची ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमारसोबतची जोडी हिट ठरली.

निम्मी यांचे स्क्रिप्टराइटर रझाशी लग्न झाले होते. पण रझख यांचे 2007 साली निधन झाले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा