Advertisement

शिवसेनेने राज्यसभेत भूमिका कशी बदलली? अमित शहांचा टोला

लोकसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या ​शिवसेनेने​​​ रातोरात भूमिका कशी बदलली? असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर शेलक्या शब्दांत टीका केली.

शिवसेनेने राज्यसभेत भूमिका कशी बदलली? अमित शहांचा टोला
SHARES

लोकसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने रातोरात भूमिका कशी बदलली? असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर शेलक्या शब्दांत टीका केली.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेत हे विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात आलं आहे. यावर राज्यसभेत चर्चा सुरू असून राज्यसभा सदस्यांच्या प्रश्नावर गृहमंत्री उत्तरं देत आहेत. त्यावर मुद्दा उपस्थित करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जे पक्ष या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नाहीत ते देशद्रोही ठरतील काय? असं वक्तव्य केलं होतं.  

हेही वाचा- ‘त्या’ शाळेचे आम्ही हेडमास्तर, संजय राऊतांनी सुनावलं

त्यावर उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, शिवसेनेची भूमिका जनतेत गोंधळ निर्माण करणारी आहे. आम्ही कधीच म्हणालो नव्हतो की जे पक्ष या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नाहीत, ते देशद्रोही ठरतील. तरीही महाराष्ट्रातील सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेकडून हे वक्तव्य केलं जात आहे. मला हे कळत नाही की लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेची भूमिका राज्यसभेतील मतदानावेळी रातोरात कशी बदलली?

लोकसभेत विधेयकाच्या बाजूने शिवसेनेने मतदान केल्यानंतर आपली बाजू सावरताना शिवसेनेला बरीच मेहनत करावी लागली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा