Advertisement

‘कॅब’ला पाठिंबा न देणारे देशद्रोही कसे? राऊतांचा भाजपला सवाल

या विधेयकाबाबत शिवसेनेच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना ‘कॅब’ला पाठिंबा न देणारे देशद्रोही कसे? असा प्रश्न शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

‘कॅब’ला पाठिंबा न देणारे देशद्रोही कसे? राऊतांचा भाजपला सवाल
SHARES

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी नागरिकत्व दुरूस्ती विधेयक राज्यसभेत सादर केलं असून या विधेयकावर चर्चा सुरू आहे. या विधेयकाबाबत शिवसेनेच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना ‘कॅब’ला पाठिंबा न देणारे देशद्रोही कसे? असा प्रश्न शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.  

हेही वाचा- 'कॅब' विधेयकावरून शिवसेनेचं भांगडा पाॅलिटिक्स सुरू, ओवेसी यांची बोचरी टीका

शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा देत मतदान केलं होतं. त्यावरून काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेला या पाठिंब्यावरून स्पष्टीकरण द्यावं लागलं. महाराष्ट्रातील किमान समान कार्यक्रम वेगळा आणि राष्ट्रीय हित वेगळं असल्याचं शिवसेनेला म्हणावं लागलं होतं.

त्यानंतर या विधेयकाबाबत स्पष्टता आल्यानंतरच शिवसेना या विधेयकाला राज्यसभेत पाठिंबा द्यायचं की नाही हे ठरवेल, असं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. 

हेही वाचा- भाजप, शिवसेना एकत्र येणार?, मनोहर जोशींनी केलं खळबळजनक वक्तव्य

शिवाय एखाद्या पक्षाने या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं नाही, तर तो पक्ष देशद्रोही ठरेल काय? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा