भाजप, शिवसेना एकत्र येणार?, मनोहर जोशींनी केलं खळबळजनक वक्तव्य

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं, असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु सद्यस्थितीत दोन्ही पक्षांना हे मान्य असावं, असं वाटत नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलं.

SHARE

वृत्तसंस्थेशी बोलताना जोशी यांनी आपल्या मनातील ही इच्छा बोलून दाखवली आहे. परंतु सद्यस्थितीत तरी त्यांचं म्हणणं कुठल्या पक्षाला पटेल, असं वाटत नाही. ते देखील उद्धव ठाकरे यांच्या रुपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला असताना. 

विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला कौल दिला असला, तरी दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद झाले. सत्तेतील समान वाट्यासह अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची शिवसेनेची अट भाजपने मान्य न केल्याने शिवसेना या युतीतून बाहेर पडली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी मोट बांधून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या