'कॅब' विधेयकावरून शिवसेनेचं भांगडा पाॅलिटिक्स सुरू, ओवेसी यांची बोचरी टीका

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून ​शिवसेनेचं​​​ भांगडा पाॅलिटिक्स सुरू असल्याची बोचरी टीका एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

SHARE

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून शिवसेनेचं भांगडा पाॅलिटिक्स सुरू असल्याची बोचरी टीका एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली. 

हेही वाचा-  भाजप, शिवसेना एकत्र येणार?, मनोहर जोशींनी केलं खळबळजनक वक्तव्य

एका बाजूला शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नावाने सत्ता स्थापन केली. त्याआधी किमान समान कार्यक्रम सादर करताना त्यात धर्मनिरपेक्षता हा शब्द घालून त्यानुसार राज्य चालवण्याचं आश्वासन दिलं. तर दुसरीकडे धर्मनिरपेक्षतेला विरोध करणाऱ्या नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला. हा निव्वळ दुट्टपीपणा असल्याचं ओवेसी म्हणाले.

शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिल्यावरून काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर खुलासा करताना हे विधेयक देशहिताचं असल्यानेच शिवसेनेला त्याला पाठिंबा दिला. तर महाराष्ट्रातील किमान समान कार्यक्रम वेगळ्या उद्देशाने तयार केल्याचं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले होते.

हेही वाचा- पाठिंबा द्यायचा की नाही? नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून शिवसेना गोंधळात

तर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आम्ही काय करायचं ते इतरांनी शिकवू नये, असं म्हणत जोपर्यंत या विधेयकात स्पष्टता येणार नाही, तोपर्यंत राज्यसभेत या विधेयकाला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मांडली. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या