Advertisement

‘त्या’ शाळेचे आम्ही हेडमास्तर, संजय राऊतांनी सुनावलं

म्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे हेडमास्तर होते, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल

‘त्या’ शाळेचे आम्ही हेडमास्तर, संजय राऊतांनी सुनावलं
SHARES

लोकशाहीत विरोधाचाही आवाज असतो. त्याची दखल घेतली पाहिजे. ज्या लोकांचा या विधेयकाला विरोध आहे, ते देशद्रोही आणि ज्यांचा पाठिंबा आहे ते देशभक्त असल्याची टीका केली जात आहे. आम्ही किती कट्टर हिंदू आहोत, याचं प्रमाणपत्र आम्हाला द्यायची गरज नाही, असं म्हणताना तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे हेडमास्तर होते, अशा शब्दांत राज्यसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत भाजपवर हल्लाबोल केला. 

हेही वाचा- ‘कॅब’ला पाठिंबा न देणारे देशद्रोही कसे? राऊतांचा भाजपला सवाल

या विधेयकाला देशाच्या अनेक भागांतून विरोध होत आहे. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनंही झाली आहेत. हे विधेयक धार्मिक नाही, पण या विधेयकावर मानवतेच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली पाहिजे. शरणार्थी आणि घुसखोरांमध्ये फरक आहे. पाकिस्तान किंवा इतर देशात आपल्या बांधवांवर अत्याचार होत असेल, तर त्यांना साथ दिली पाहिजे. पण भारतात ज्यांनी ज्यांनी घुसखोरी केली. त्यांना देशाबाहेर काढलं पाहिजे.  

हेही वाचा- राष्ट्रीय हितासाठी विधेयकाच्या बाजूने मतदान, शिवसेनेने स्पष्ट केली भूमिका

ज्या लाखो-करोडो लोकांना तुम्ही आपल्या देशात आश्रय देणार आहात, त्यांना तुम्ही मतदानाचाही हक्क देणार आहात का? त्यांना २०-२५ वर्षे मतदानाचा हक्क दिला नाही तरच देशाची परिस्थिती समतोल राहील, असं राऊत म्हणाले. सरकारने हिंदू-मुस्लीम फुटीचे पुन्हा प्रयत्न करू नयेत. शिवाय श्रीलंकेतील तामिळ हिंदूबाबतही सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असं राऊत म्हणाले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा