Advertisement

अधिवेशनात सहभागी होणाऱ्यांची कोरोना चाचणी

कोरोनाच्या काळात हे अधिवेशन होणार असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला.

अधिवेशनात सहभागी होणाऱ्यांची कोरोना चाचणी
SHARES

मुंबईसह राज्यभरात मागील अनेक दिवसांपासून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढ आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात सर्वांचीच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, शनिवारी कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या.

विधानभवन परिसरात शनिवारी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत अंतरनियमांचा पुरता बोजवारा उडाला. नियोजनाचा अभाव, बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांचा फौजफाट्याची घुसखोरी, मंत्रालय, व विधानभवन कर्मचाऱ्यांची वशीलेबाजी यामुळं या चाचणीच्या पहिल्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना समोरं जावं लागलं.

विधिमंडळाचे २ दिवसीय पावसाळी अधिवेशन सोमवार आणि मंगळवारी होणार आहे. कोरोनाच्या काळात हे अधिवेशन होणार असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय, अधिवेशनाच्या तोंडावरच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, दुग्धविकासमंत्री सुनिल केदार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

अधिवेशनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्वाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शनिवारी विधानभवनाच्या आवारात कोरोना चाचणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या ठिकाणी मंत्री,आमदार,अधिकारी, पोलीस, पत्रकार,सफाई कामगार आदींसाठी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र  समन्वय आणि नियोजनाच्या अभावामुळं ही व्यवस्था कोडलमडून पडली होती.



हेही वाचा -

बेस्ट प्रवासात अंतरनियमांकडं प्रवाशांचं दुर्लक्ष

सुशांत आत्महत्या प्रकरण : अभिनेत्री रियाला होऊ शकते केव्हाही अटक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा