Advertisement

बेस्ट प्रवासात अंतरनियमांकडं प्रवाशांचं दुर्लक्ष

मुंबईची लाइफलाइन लोकल यावेळी बंद असल्यानं सर्वाधिक प्रवासी हे बेस्टनं प्रवास करू लागले.

बेस्ट प्रवासात अंतरनियमांकडं प्रवाशांचं दुर्लक्ष
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बेस्टनं आपली सेवा कायम ठेवली होती. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा मिळावी यासाठी बेस्ट कामगार आपला जीव धेक्यात घालून प्रवाशांना सेवा पुरवत होते. मात्र, मुंबईची लाइफलाइन लोकल यावेळी बंद असल्यानं सर्वाधिक प्रवासी हे बेस्टनं प्रवास करू लागले. त्यामुळं मागील अनेक वर्षांपासून बेस्टची कमी झालेली प्रवासी संख्या काही महिन्याच अधिक भरून निघाली. परंतु, सध्या कोरोनाचं सावट मुंबईवर असल्यानं ही वाढ धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

प्रवासी संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं बेस्टचा प्रवास अधिक जीवघेणा ठरू लागला आहे. इतर सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्यानं बहुतांश प्रवाशांना बेस्टवर अवलंबून राहावं लागत आहे. परिणामी जागा मिळविण्याची धडपड करताना अंतरनियमांचं पालन केलं जात नसल्याचं निदर्शनास येत आहे. एका आसनावर एक प्रवासी व उभ्यानं ५ प्रवासी असा नियम असतानाही प्रत्येक आसनावर २ प्रवासी, तर १० ते १५ किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी उभ्यानं प्रवास करतात. त्यामुळं अंतरनियमांचा फज्जा उडत आहे.

१ सप्टेंबरपासून खासगी-सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ झाल्यानं प्रवासी संख्या आणखी वाढली. सध्या बेस्टची प्रवासी संख्या १६ लाखांपर्यंत पोहोचली असून ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या ४ दिवसांत ६६ हजार प्रवाशांची भर पडली आहे. बेस्ट प्रशासनाकडून जादा प्रवासी बसमध्ये घेण्याची सक्ती चालक, वाहकांना केली जात आहे.

प्रवासी संख्या

तारीख
प्रवासी
८ जून
४,१९०००
३१ ऑगस्ट
१५,३२,३६४
२ सप्टेंबर
१५,७३,८३०
३ सप्टेंबर
१५,९४,७३२
४ सप्टेंबर  
१५,९८,८४२

                   


हेही वाचा -

लॉकडाऊनमुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ

बेस्टच्या डबल डेकर बसचा अपघात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा