Advertisement

लॉकडाऊनमुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर सामान्यांना बेस्टनं प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यामुळं बेस्टच्या प्रवाशी संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

लॉकडाऊनमुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईतील वाहतूक सेवा बंद करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तसंच, या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविण्यासाठी बेस्टनं आपली सेवा सुरू ठेवली. परंतु, सामान्यांसाठी ही सेवा बंद होती. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर सामान्यांना बेस्टनं प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यामुळं बेस्टच्या प्रवाशी संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढू लागल्यानं पहिल्याच दिवशी बेस्टच्या प्रवासी संख्येत ४१ हजार प्रवाशांची भर पडली. ही प्रवाशी संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रवाशांच्या तुलनेत बेस्टच्या फेऱ्या वाढविता येत नसल्यानं उपनगरी रेल्वे सुरू होईपर्यंत प्रवाशांना रेटारेटी करतच घर-कार्यालय-घर असा प्रवास करावा लागणार आहे.

१ सप्टेंबरपासून खासगी कार्यालयांना कर्मचाऱ्यांची उपस्थिती १० वरून ३० टक्यांपर्यंत वाढविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची मुभा नाही. त्यामुळे त्यांचा सर्व भार बेस्टवर येत आहे. ३१ ऑगस्टला ३,३७६ बसफेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यातून १५.३२ लाख प्रवाशांनी प्रवास केला. १ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती. तरीही या दिवशी प्रवासी संख्या १३,५२,८५३ होती.

२ सप्टेंबरला खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचा भार वाढल्याने बेस्टची प्रवाशी संख्या १५ लाख ७३ हजार ८३० वर गेली. सोमवारच्या तुलनेत बुधवारी प्रवाशांची संख्या ४१ हजाराने वाढली. तुलनेत बेस्टच्या फेऱ्या जैसे थे (३,३७९) आहेत. सरकारी व खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांबरोबरच काही प्रमाणात यात अन्य प्रवाशांचाही यात समावेश आहे.

मागील ३ महिन्यांच्या कालावधीत बेस्ट प्रवाशांची संख्या अडीच लाखांवरून १५ लाखांवर पोहोचली. त्यामुळं सोशल डिस्टन्सिंगचं नियम पाळणं मोठं आव्हान ठरत आहे. लॉकडाऊनपूर्वी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज ३४ लाख प्रवासी प्रवास करीत होते. मात्र जून महिन्यात प्रवाशांची संख्या अडीच लाख एवढी होती. ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईत दररोज ३ हजार ४०० बसगाड्या धावत असून, दररोज सरासरी १५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत.



हेही वाचा -

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ, अडीच लाखांवरून १५ लाखांवर

'क्यूआर कोड'ला बेस्ट प्रवाशांचा कमी प्रतिसाद


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा