Advertisement

'क्यूआर कोड'ला बेस्ट प्रवाशांचा कमी प्रतिसाद

बेस्टनं सुरू केलेल्या या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद फार कमी मिळत आहे.

'क्यूआर कोड'ला बेस्ट प्रवाशांचा कमी प्रतिसाद
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंडक्टर आणि प्रवाशांमधील संपर्क टळावा यासाठी क्यूआर कोडचा मार्ग स्वीकारण्यात आला. मात्र, बेस्टनं सुरू केलेल्या या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद फार कमी मिळत आहे. दरम्यान, बेस्टनं जुलैपासून ही सेवा सुरू केली आहे.

आत्तापर्यंत सुमारे ८,५०० प्रवाशांनीच क्यूआर कोडच्या साह्यानं तिकिटं काढली आहेत. दरम्यान, कोरोनाच्या बचावासाठी जुलैपासून क्यूआर कोडची सुविधा बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली. त्यावेळी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा प्रशासनाला अंदाज होता. प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, हा उपक्रमाचा अंदाज खोटा ठरला. 

बेस्टने १६ जूनपासून सुमारे १४ आगारांमध्ये ही सुविधा सुरू केली होती. त्यानंतर सर्वच आगारात त्या सेवांचा विस्तार करण्यात आला. त्यात जुलैमध्ये फक्त १,५०० प्रवाशांनी प्रतिसाद दिला असून ऑगस्ट अखेरपर्यंत ही संख्या ८,४७९ प्रवाशांपर्यंतच मर्यादित राहिला. कंडक्टरने प्रवाशांचा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तिकीटाची रक्कम वळती होते.



हेही वाचा -

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा