Advertisement

बेस्टच्या डबल डेकर बसचा अपघात

बेस्टच्या डबल डेकर बसचा आपघात झाल्याची घटना साताक्रुझ परिसरात घडली आहे.

बेस्टच्या डबल डेकर बसचा अपघात
SHARES

बेस्टच्या डबल डेकर बसचा आपघात झाल्याची घटना साताक्रुझ परिसरात घडली आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमरास सांताक्रुझ-चेंबुर लिंक रोड झाल्याची माहिती मिळते. या अपघातात बेस्टचा पुढील चाक वाकला असून अर्धे बाहेर आले आहे.

बस क्रमांक ३३२ ही बस अंधेरी स्थानकाहून कुर्ला बस स्थानकाच्या दिशेनं जात होती. त्यावेळी या बस मार्गाच्या सांताक्रुझ-चेंबुर लिंक रोड या परिसरात हा अपघात झाला. या डबल डेकर बसचा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.

अपघातापूर्वी ही बस प्रवाशांनी पर्णपणे भरल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली. त्याशिवाय, या अपघाताची प्रशासनानं दखल घेतली आहे.



हेही वाचा -

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा