Advertisement

मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित, पाराही चढला

रविवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १०० वर पोहोचला होता.

मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित, पाराही चढला
SHARES

मागील काही दिवसांपासून मुंबईत प्रचंड उकाडा वाढला आहे. या उकाड्यासोबतच मुंबईमध्ये रविवारी ठिकठिकाणी धुरकंही जाणवली. त्याशिवाय, मुंबईची हवा पुन्हा एकदा प्रदूषित झाली. रविवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १०० वर पोहोचला होता. रविवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील हवेचा दर्जा हा अती वाईट होता. अचानक उकाड्यात वाढ झाल्यानं मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातील लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं हवेचा गुणवत्ता निर्देशांक ५० ते ६० नोंदला गेला होता. त्यानंतर रविवारी या निर्देशांकानं १०० चा आकडा गाठल्यानं पुन्हा एकदा प्रदूषणाचा स्तर उंचावू लागल्याचं निदर्शनास आलं. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १०० असल्यानं रविवारीही हवा समाधानकारक श्रेणीमध्येच नोंदली गेली.

बोरिवली, मालाड, अंधेरी, वरळी, माझगाव इथं हवेचा दर्जा घसरुन मध्यम नोंदला गेला तर वांद्रे-कुर्ला संकुल इथं हा दर्जा अती वाईटपर्यंत खाली घसरला. मुंबईतील कुलाबा, चेंबूर आणि भांडुप या ३ केंद्रांवर हवेचा दर्जा समाधानकारक असल्याचं रविवारी नोंदलं गेलं. नवी मुंबईमध्येही हवेची गुणवत्ता समाधानकार असल्याचं नमूद करण्यात आलं.

मुंबईत वाढ

  • वांद्रे-कुर्ला संकुल येथे पीएम २.५ या प्रदूषकांची पातळी ३०४ नोंदली गेली. तर पीएम १० ची पातळी १२८ होती. 
  • बोरिवलीमध्ये पीएम १० आणि पीएम २.५ या दोन्हीची पातळी १३५ च्या पुढे होती
  • मालाडमध्ये पीएम २.५ ची पातळी १३५ होती तर पीएम १० ची पातळी १०६ होती. 
  • अंधेरीमध्ये पीएम २.५ ची पातळी १०१ नोंदली गेली. 
  • वरळीमध्ये ओझोनचे प्रमाण ११८ होते. 
  • माझगावमध्ये पीएम १० चे प्रमाण १०८ होते.

सफरच्या माध्यमातून अनलॉक-१ आणि अनलॉक-४ यांची तुलना नोंदवण्यात आली आहे. यामध्ये अनलॉक-४ च्या काळामध्ये नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीमध्ये मुंबईत ६० टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. दिल्ली, अहमदाबाद आणि पुणे या शहरांच्या तुलनेत मुंबईतील ही वाढ सर्वाधिक आहे.



हेही वाचा -

बेस्ट प्रवासात अंतरनियमांकडं प्रवाशांचं दुर्लक्ष

धोका वाढला! महाराष्ट्रात दिवसभरात सर्वोच्च २३,३५० नव्या रुग्णांची नोंद, ३२८ जणांचा मृत्यू


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा