सुशांत आत्मत्येनंतर ड्रग्ज वितरक भूमिगत

फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा व अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलीवूड वर्तुळात ड्रग्स पुरवठा करणारे डझनभर वितरक आता अंडरग्राऊंड झाले

सुशांत आत्मत्येनंतर ड्रग्ज वितरक भूमिगत
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दोन ड्रग्ज तस्करांची नावे पुढे आल्यानंतर ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या रॅकेटशी संबधीत इतर व्यक्ती भूमिगत झाले आहेत. या प्रकरणात एनसीबीने पेज थ्री सेलिब्रीटींशी संबंधीत अनुज केशवानी या बड्या वितरकाला अटक केली होती. फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा व अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलीवूड वर्तुळात ड्रग्स पुरवठा करणारे डझनभर वितरक आता अंडरग्राऊंड झाले आहेत.

हेही वाचाः- आणखी एका बँकेत घोटाळा, मुंबईत सीबीआयचे चार ठिकाणी छापे

मुंबई पोलिसांनीही गेल्या दोन वर्षांत पश्चिम मुंबईत ७० हून अधिक कारवाया केल्या आहेत. त्यातील ३० कारवायांमध्ये ड्रग्सचा साठा पकडण्यात आला आहेत . मुंबईतील कारवाईत अटक करण्यात आलेल्या वितरकांचेही वांद्रे परिसरात जाळे होते. त्याची तार शौविकपर्यंत पोहोचली होते. जैद आणि बशीद या दोन संशयीतांकडून एनसीबी मुंबईतील ड्रग्स वर्तुळाबाबतची महत्त्वपूर्ण माहिती घेतली आहे. संशयीत जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून त्याची चौकशी याप्रकरणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तो वांद्रे परिसरात सक्रिय होता.

हेही वाचाः -हृदयद्रावक घटना आई पाठोपाठ, पोलिसाचाही कोरोनाने मृत्यू

 जैदने  १७ मार्च दिलेल्या ड्रग्स डिलेवरीचे तार सुशांत सिंग प्रकरणाशी जुळत आहेत. त्या माहितीच्या आधारे एनसीबीने त बशीद परिहार नावाच्या एका २० वर्षीय तरुणाला देखील ताब्यात घेतले. हा तोच बशीद आहे याच बशीदने या प्रकरणाशी संबंधीत एका व्यक्तीची ओळख जैदशी केल्याचे बोलले जात आहे.   जैद हा बांद्राला राहत असून त्याचे पुर्ण नाव जैद विलात्रा आहे. तर एनसीबीच्या हाती एक  व्हाॅट्स अॅप चॅट आहे. ज्यात या जैद आणि बशीदचे नाव आहे. या प्रकरणी आतापर्यंत रियासह १० जणांना अटक झाली आहे. याशिवाय प्रकरणाचे तार आपल्या  पर्यंत पोहोचू नये, यासाठी अनेक तस्कर सध्या अंडरग्राउंड झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सुशांत सिंग प्रकरणामुळे वातावरण गरम झाले आहे. त्यामुळे काही काळ पश्चिम मुंबईतील ड्रग्स वर्तुळातही शांतता पहायला मिळेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा