कहानी मे आया ट्विस्ट ! हे कारण पुढे करत रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली तक्रार

सुशांत आत्महत्या प्रकरणात आता आणखी किती नवनवीन खुलासे समोर येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कहानी मे आया ट्विस्ट ! हे कारण पुढे करत रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली तक्रार
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांनी सुशांत सिंग राजपूत यांची बहीण प्रियंका सिंह आणि इतरांवर फसवणूकीचा गुन्हा नोंदवा अशी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे  सुशांत आत्महत्या प्रकरणात आता आणखी किती नवनवीन खुलासे समोर येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सुशांत हा मागील अनेक दिवसांपासून आजारी असताना. त्याची बहिण आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डाॅक्टर तरुण कुमार यांनीच सुशांतला मेडिकल प्रिस्क्रिपशन देत, एका आठवड्यासाठी लिब्रियम आणि रोज नेक्सिटो आणि लोनाजेप घेण्यास सांगितले आहे. मात्र आता ते प्रस्क्रिपशन बनावट असल्याचा दावा रियाने केला आहे. त्यामुळे रियाने एनडीपीएस अँक्ट आणि टेली मेडिसीन गाइडलाइन २०२० अंतर्गत या दोघांविरोधात गुन्हा नोंदवून तपास करण्याची मागणी लेखी तक्रारीत मुंबई पोलिसांना केली आहे. रिया चक्रवर्तीची ही तक्रार ८ जून रोजी सुशांत आणि त्याची बहिण यांच्यात व्हॉट्सअॅप चॅटविषयी आहे. रिया चक्रवर्ती त्याच दिवशी सुशांतचे घर सोडली. त्या गप्पांमधून हे उघड झाले.

हेही वाचाः- कंगना मुंबईत आली की तिला... महापौरांनी दिले संकेत

यापूर्वी सुशांत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्ती सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोसमोर हजर झाली. रविवारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रियावर सहा तास चौकशी केली आणि पुन्हा हजर राहण्यास सांगितले. सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास २८ वर्षीय अभिनेत्री बल्लार्ड इस्टेट येथील एनसीबी कार्यालयात पोहोचली. ती पोलिस कर्मचार्‍यांसह तेथे पोहोचली. एनसीबीने म्हटले होते की रिया जेव्हा चौकशीसाठी हजर होईल तेव्हा तिचा भाऊ शौक चक्रवर्ती (२४), राजपूत घराचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा (३३) आणि राजपूतचा वैयक्तिक कर्मचारी दीपक सावंत यांची समोरा समोर चौकशी केली जाईल.

हेही वाचाः- Vodafone-Idea ला मिळालं नवं नाव, पण ग्राहकांना भुर्दंड

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा