सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या भावाला अटक

शौलिक चक्रवर्तीने दिलेल्या आँर्डरनंतर परिहारने विलात्र आणि आणखी एक व्यक्ती कैझान इब्राहिम यांच्याकडून मादक पदार्थ खरेदी केल्याची कबूली दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या भावाला अटक
SHARES

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित मादक पदार्थांच्या प्रकरणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला शुक्रवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अटक केली. शौविक शिवाय अभिनेता सुशांतच्या घराचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यालाही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः- सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती एनसीबीच्या ताब्यात

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रिया आणि शौविक यांचे अंमली पदार्था विषयीचे चॅट सर्वत्र उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी सकाळीच शौविकच्या घरी छापा टाकला. तर सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यालाही ताब्यात घेण्यात आले. दिवसभराच्या चौकशीनंतर या दोघांचा सहभाग निश्चित झाल्याचे तपासात पुढे आले. शौविकच्या अटकेनंतर आता रियावर पुन्हा एकदा ड्रग्जबद्दल विचारपूस केली जाऊ शकते.

हेही वाचाः-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण: रिया चक्रवर्तीच्या व्हाॅट्स अॅप मेसेजमधून धक्कादायक खुलासा

यापूर्वी शुक्रवारी एनसीबीने मुंबई कोर्टाला सांगितले की, अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित मादक पदार्थांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अब्देल बासित परिहारने शौविक चक्रवर्ती यांच्या निर्देशानुसार मादक पदार्थांची खरेदी केली असे म्हटले आहे. शौलिक चक्रवर्तीने दिलेल्या आॅर्डरनंतर परिहारने विलात्र आणि आणखी एक व्यक्ती कैझान इब्राहिम यांच्याकडून मादक पदार्थ खरेदी केल्याची कबूली दिली आहे. चौकशीत परिहारने मोठ्या सेलिब्रिटी आणि मादक द्रव्यांच्या व्यापार्‍यांचा समावेश असलेल्या मोठ्या ड्रग नेटवर्कचा तो सक्रिय सदस्य असल्याचे सांगितले. "परिहार यांनी अनेक नावे उघड केली आहेत आणि मोठ्या तस्करांना पकडण्यासाठी त्याची कस्टडी घेणे आवश्यक असल्याचे एनसीबीने कोर्टात सांगितले होते.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा