टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आणि आयडियानं (Vodafone Idea) त्यांच्या नावांचं रि ब्रँडिंग केलं आहे. ही कंपनी आता vi म्हणून ओळखली जाणार आहे. V व्होडाफोन आणि I हा आयडियासाठी लिहिला गेला आहे. यासोबतच कंपनीनं दर वाढवण्याचे संकेत देखील दिले आहेत.
आयडिया आणि व्होडाफोन या दोन्ही कंपनींनं त्यांच्या नवीन ब्रँडिंगची घोषणा केली. यावेळी विलीनीकरण हे या दोन ब्रँडचं आतापर्यंतचं जगातील सर्वात मोठं टेलिकॉम इंट्रीगेशन आहे. या कंपनीचा मालकी हक्क यूकेच्या व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समूहाकडे आहे.
२०१८ मध्ये या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यानंतर व्होडाफोन आयडिया नावाची कंपनी अस्तित्वात आली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी व्होडाफोन आयडियाचं विलीनीकरण करण्यात आलं होतं. आम्ही तेव्हापासून दोन मोठे नेटवर्क म्हणून एकत्रपणे काम करत आहोत. आज या vi ब्रँडची ओळख करुन दिल्यानं मला आनंद होत आहे.
आणखी मोठं नेटवर्क तयार करण्यासाठी कंपनीनं दर वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. या नवीन दरांमुळे कंपनीला एआरपीयू सुधारण्यास मदत होणार आहे. सध्या हा दर ११४ रुपये आहे. तर एअरटेल आणि जिओचे एपीआरयू १५७ आणि १४० रुपये आहे.
हेही वाचा