Advertisement

व्होडाफोन-आयडियाची डबल डेटा सर्विस बंद

वोडाफोन-आयडियानं लॉकाडाऊनच्या काळात त्यांच्या ग्राहकांसाठी दिलेली डबल डेटा सर्व्हिस बंद केली आहे.

व्होडाफोन-आयडियाची डबल डेटा सर्विस बंद
SHARES

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियानं लॉकाडाऊनच्या काळात त्यांच्या ग्राहकांसाठी दिलेली डबल डेटा सर्व्हिस बंद केली आहे. यामुळे कंपनीच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. देशातील आठ सर्कलमधील डबल डेटा ऑफरचे प्लॅन बंद केले आहेत. कंपनीनं गेल्याच महिन्यात २४९, ३९९ आणि ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये डबल डेटाची ऑफर दिली होती. यानुसार दीड जीबी डेटा मिळत होता त्याऐवजी तीन जीबी डेटा ग्राहकांना दिला होता.

रिपोर्टनुसार व्होडाफोन-आयडियानं आंध्रप्रदेश, बिहार, गुजरात, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा, नॉर्थ इस्ट, पंजाब, उत्तर प्रदेशात त्यांच्या डबल डेटाची ऑफर बंद केली आहे. यामुळे २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारा तीन जीबी डेटा आणि दररोज दीड जीबी मिळणार आहे. यूजर्सना या प्लॅनमध्ये इतर सुविधा पहिल्याप्रमाणेच मिळतील. यात अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि व्होडाफोन प्ले,  झी5 अॅप चा समावेश आहे. या पॅकची वैधता २८ दिवसांसाठी आहे.

डबल डेटा ऑफरमध्ये ३९९ रुपयांमध्येही ३ जीबी डेटा दिला होता. आता यावरही दरदिवशी १.५ जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस मिळतील. तसंच व्होडाफोन प्ले, Zee5 या प्रिमीयम अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. ३९९ रुपयांचा हा प्लॅन ५६ दिवसांसाठी आहे.

व्होडाफोन-आयडियानं त्यांच्या ५९९ च्या प्लॅनमध्येही डबल डेटा ऑफर दिली होती. मात्र आता यावरसुद्धा दीड जीबी डेटा मिळेल. तसंच अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस मिळतील. तसंच व्होडाफोन प्ले, Zee5 या प्रिमीयम अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. या पॅकची मुदत ८४ दिवस इतकी होती.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा