Advertisement

पंजाब नॅशनल बँकेचं गृह, वाहन कर्ज महागलं

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी सरकारी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेचं गृहकर्ज, वाहन कर्ज आणि आणि इतर कर्जे आता महाग होणार आहेत.

पंजाब नॅशनल बँकेचं गृह, वाहन कर्ज महागलं
SHARES

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी सरकारी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेचं गृहकर्ज, वाहन कर्ज आणि आणि इतर कर्जे आता महाग होणार आहेत. बँकेने रेपोशी दराशी संबधित व्याजदर (आरएलएलआर) सोमवारी ०.१५ टक्क्यांनी वाढवला आहे. हा दर आता ६.८० टक्के झाला आहे.

१ सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. बँकेचा आरएलएलआर ६.६५ टक्क्यावरून ६.८० टक्के झाला आहे. गृह, शिक्षण, वाहन, सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी घेण्यात येणारे कर्ज आदी आरएलएलआरशी जोडलेले आहेत. त्यामुळे हे दर वाढवल्यामुळे या सर्व कर्जांचे व्याजदर वाढणार आहेत.

कर्जाच्या ईएमआयवर देण्यात येणारी सूट वाढवण्यात येणार की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लॉकडाऊननंतर आरबीआयने तीन महिन्यांसाठी लोन मोरटोरियमची घोषणा केली होती. लोन मोरटोरियम सुविधा डिसेंबरपर्यंत वाढवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.  मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांसाठी असणारी ही सवलत त्यानंतर आणखी तीन महिन्यासाठी वाढवण्यात आली होती. हेही वाचा -

आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गृहकर्ज, बँकांचे 'असे' आहेत व्याजदर

४ सरकारी बँकांचं होणार खासगीकरण


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा