
कोरोनाच्या संकटामुळे मागील पाच महिने संपूर्ण देश ठप्प झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. देशातील बँकांही संकटात आल्या आहेत. लॉकडाउनमुळे कर्ज वितरण ठप्प झालं आहे. त्यामुळे बँकांकडे मोठ्या प्रमाणात रोकड तरलता उपलब्ध आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता बँकांनी गृह कर्ज आणि इतर कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.
बँकिंग यंत्रणेत सध्या आठ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड पडून आहे. त्यामुळे व्याजदर कमी करून कर्ज वाटपावर बँकांकडून भर देण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे आता बँकांना कमीत कमी व्याजदराने कर्जे देण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. देशातील अनेक बँकांनी आपल्या गृह कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे.
असे आहेत बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर
| बँक | गृहकर्ज व्याजदर
|
| स्टेट बँक ऑफ इंडिया | ६.९५ टक्के
|
| सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया | ६.८५ टक्के |
| कॅनरा बँक | ६.९ टक्के |
| बँक ऑफ इंडिया | ६.८५ टक्के |
| युनियन बँक ऑफ इंडिया | ६.७ टक्के |
| बँक ऑफ बडोदा | ६.८५ टक्के |
| एलआयसी हौसिंग फायनान्स | ६.९० टक्के |
| अॅक्सिस बँक | ७.७० टक्के |
| एचडीएफसी बँक | ६.९५ टक्के |
| आयसीआयसीआय बँक | ६.९५ टक्के |
